वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ११/१५ पृ. १४-१५
  • यहोवाच्या उदारतेबद्दल कदर दाखवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या उदारतेबद्दल कदर दाखवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उदारतेचं सर्वोत्तम उदाहरण
  • हे काम मोठं आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • त्यांच्या वैपुल्यातून गरज भागली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • स्वेच्छेने पुढे येणाऱ्‍यांना यहोवा विपुल आशीर्वाद देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • इतरांना मदत करण्यासाठी आपण कसा लावू शकतो हातभार?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ११/१५ पृ. १४-१५
एक स्त्री इलेक्ट्रॉनिक कार्ड रिडरमध्ये बँक कार्ड टाकताना

यहोवाच्या उदारतेबद्दल कदर दाखवा

यहोवा एक उदार देव आहे. (याको. १:१७) विश्‍वाच्या अफाट पोकळीतील लक्षावधी ताऱ्‍यांपासून पृथ्वीवर पांघरलेल्या हिरव्यागार मखमलीपर्यंत, सर्व गोष्टी देवाच्या उदारतेची साक्ष देतात.—स्तो. ६५:१२, १३; १४७:७, ८; १४८:३, ४.

आपल्या निर्माणकर्त्याबद्दल स्तोत्रकर्त्याला खूप कदर होती. म्हणूनच, यहोवाच्या कृत्यांबद्दल एक गीत लिहिण्यास तो प्रवृत्त झाला. हे गीत आपल्याला स्तोत्र १०४ मध्ये वाचायला मिळतं. ते वाचल्यावर तुम्हालाही कदाचित स्तोत्रकर्त्यासारखंच वाटेल. त्यानं म्हटलं: “माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्‍वराचे गुणगान गाईन; मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.” (स्तो. १०४:३३) तुम्हालाही असंच करावंसं वाटत नाही का?

उदारतेचं सर्वोत्तम उदाहरण

उदारतेबद्दल आपण यहोवाचं अनुकरण करावं असं त्याला वाटतं. आणि आपण असं का केलं पाहिजे याची सबळ कारणंही तो आपल्याला देतो. त्यानं प्रेषित पौलाला काय लिहिण्यासाठी प्रेरित केलं याकडे लक्ष द्या: “प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी; चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे; जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.”—१ तीम. ६:१७-१९.

पौलानं करिंथ मंडळीला दुसरं पत्र लिहिलं, तेव्हा त्यानं दान देण्याविषयी योग्य दृष्टिकोन बाळगण्यावर जोर दिला. त्यानं म्हटलं: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथ. ९:७) हे सांगितल्यानंतर, त्यानं उदारतेनं दान दिल्यामुळे ज्यांना फायदा होतो त्यांचा उल्लेख केला. तो म्हणाला, की ज्यांना दान मिळतं त्यांच्या गरजा भागवल्या जातात. शिवाय, जे दान देतात त्यांना अनेक आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात.—२ करिंथ. ९:११-१४.

पौलानं आपल्या पत्राच्या शेवटी देवाच्या उदारतेच्या सर्वात मोठ्या पुराव्याबद्दल सांगितलं. त्यानं म्हटलं: “देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती होवो.” (२ करिंथ. ९:१५) यहोवा देत असलेल्या अवर्णनीय दानामध्ये, तो येशू ख्रिस्ताद्वारे संपूर्ण मानवजातीला जो काही चांगुलपणा दाखवत आहे त्याचा समावेश होतो. या चांगुलपणाचं मोल शब्दांत व्यक्‍त करणं शक्य नाही.

यहोवा आणि त्याच्या पुत्रानं आपल्यासाठी जे केलं आणि भविष्यात जे करणार आहे, त्यासाठी आपण कदर कशी दाखवू शकतो? एक मार्ग म्हणजे, यहोवाच्या शुद्ध उपासनेला वाढवण्यासाठी आपल्या वेळेचा, शक्‍तीचा आणि साधनसंपत्तीचा उदारतेनं उपयोग करणं. मग, ते अगदी कमी प्रमाणात असो किंवा मोठ्या प्रमाणात.—१ इति. २२:१४; २९:३-५; लूक २१:१-४.

जगभरात चाललेल्या कार्यासाठी दान देण्याचे काही मार्ग

प्रेषित पौलाच्या दिवसांप्रमाणे, आजही बरेच जण ठरावीक रक्कम बाजूला ठेवतात आणि “जगभरात चाललेल्या कार्यासाठी” असं लिहिलेल्या मंडळीच्या दानपेटीत ती टाकतात. (१ करिंथ. १६:२) दर महिन्याला मंडळ्या हे दान संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. तसंच, तुमच्या देशात यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या कायदेशीर निगमाला तुम्ही थेट आपलं दान पाठवू शकता.a तुम्ही कोणकोणत्या प्रकारे थेट अनुदान पाठवू शकता ते पुढे सांगितलं आहे:

देणग्या

  • इलेक्ट्रॉनिक बँक ट्रान्सफरद्वारे दान.b

  • पैसे, दागदागिने किंवा इतर मौल्यवान वैयक्‍तिक मालमत्ता देणगी म्हणून दिली जाऊ शकते. पैसे किंवा मालमत्ता ही देणगी आहे हे सूचित करणारं एक पत्र सोबत पाठवा.

सशर्त-दान योजना

  • दात्याला गरज पडल्यास पैसे परत केले जातील या अटीवर पैशांचं दान दिलं जाऊ शकतं.

  • ही सशर्त देणगी आहे हे सूचित करणारं एक पत्र सोबत पाठवा.

धर्मादाय योजनाc

पैशांची देणगी आणि मौल्यवान वैयक्‍तिक मालमत्ता दान म्हणून देण्याव्यतिरिक्‍त जगभरातील राज्य सेवेच्या फायद्याकरता दान देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते खाली दिलेले आहेत. तुम्हाला कोणत्याही मार्गाने किंवा मार्गांनी दान देण्याची इच्छा असली, तरीसुद्धा प्रथम तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या शाखा कार्यालयाशी संपर्क साधून तुमच्या देशात कोणते मार्ग उपलब्ध आहेत याची खात्री करून घ्या. प्रत्येक देशातील कायदे आणि कराच्या बाबत असलेले नियम वेगवेगळे असल्यामुळे दान करण्याचा सर्वात उत्तम मार्ग निवडण्याअगोदर करांविषयी व कायदेशीर बाबींविषयी योग्य सल्लागारांचं मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे.

विमा: यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला, जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवलं जाऊ शकतं.

बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्‍तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार ट्रस्ट स्थापन करून किंवा मग मृत्यूनंतर ते यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला देय केलं जाऊ शकतं.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌सदेखील यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला थेट दान केले जाऊ शकतात किंवा मृत्यूनंतर हस्तांतर करण्यासंबंधी करार केला जाऊ शकतो.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर करून, जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो.

दानाची वार्षिक नेमणूक: दानाची वार्षिक नेमणूक ही अशी व्यवस्था आहे ज्यात पैसे किंवा सुरक्षितता यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर केली जाते. या व्यवस्थेत, दात्याला किंवा दात्यानं ठरवलेल्या एका व्यक्‍तीला आयुष्यभर दर वर्षाला एक नेमलेली रक्कम मिळते. दानाची वार्षिक नेमणूक ज्या वर्षी ठरवली जाते त्या वर्षी दात्याला आय-करात थोडी सूट मिळते.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर करू शकता किंवा या निगमाला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. या व्यवस्थेअंतर्गत करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात.

“धर्मादाय योजना” या शब्दांवरून सूचित होतं त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानाकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड हे माहितीपत्रक तयार करण्यात आलं आहे.d एखादी व्यक्‍ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, या बाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक लिहिण्यात आलं आहे. तुमच्या देशातील करासंबंधीचे किंवा इतर कायदे वेगळे असल्यामुळे या माहितीपत्रकातील सूचना तुमच्या परिस्थितीला कदाचित पूर्णपणे लागू होणार नाहीत. तेव्हा, हे माहितीपत्रक वाचल्यानंतर स्वतःच्या कर किंवा कायदा सल्लागारांशी चर्चा करा. दान देण्यासाठी या वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग केल्यामुळे अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असं केल्यानं मिळणाऱ्‍या कर सवलतीदेखील वाढवता आल्या आहेत. तुमच्या देशात हे माहितीपत्रक उपलब्ध असल्यास स्थानिक मंडळीच्या सचिवाला विनंती करून त्याची एक प्रत मागवली जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसोबत खाली दिलेल्या पत्त्यावर पत्राद्वारे संपर्क साधू शकता किंवा फोन नंबरचा उपयोग करून संपर्क साधू शकता:

Jehovah’s Witnesses of India

Post Box 6440, Yelahanka

Bengaluru 560064

Karnataka, India

Telephone: 09845476425 09845348815

a भारतात हे “जेहोवाज विट्‌नेसेस ऑफ इंडिया”ला देय असावे.

b भारतीय पासपोर्ट धारक www.jwindiagift.org या वेबसाईटचा उपयोग करू शकतात.

c अंतिम निर्णय घेण्याआधी स्थानिक शाखा कार्यालयाशी याबद्दल खात्री करून घ्या.

d भारतात, “तुमच्या मौल्यवान वस्तूंनी यहोवाचा सन्मान करा” नावाची पत्रिका इंग्रजी, कन्‍नड, तमिळ, तेलगू, मल्याळम व हिंदी या भाषांत उपलब्ध आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा