वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ७/१५ पृ. ३२
  • तुम्हाला माहीत होतं का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला माहीत होतं का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • जंगलं
    सावध राहा!—२०२३
  • प्रत्येक जण आपापल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ७/१५ पृ. ३२
गालीलमधील बिरीया वन क्षेत्र

गालीलमधील बिरीया वन क्षेत्र (खाली)

तुम्हाला माहीत होतं का?

बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे प्राचीन इस्राएलात खरंच खूप झाडं होती का?

बायबल सांगतं की अभिवचन दिलेल्या देशातील काही भागात झाडं अगदी “विपुल” प्रमाणात होती. (१ राजे १०:२७; यहो. १७:१५, १८) पण, सध्या या क्षेत्रात झाडांचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे, तिथं पूर्वी खरंच पुष्कळ प्रमाणात झाडं होती का, अशी शंका टीकाकार व्यक्‍त करतात.

झाडाला लागलेली उंबरं

झाडाला लागलेली उंबरं

‘लाईफ इन बिब्लिकल इस्राएल’ या पुस्तकात स्पष्ट करण्यात आलं आहे, की “प्राचीन इस्राएलमध्ये आजच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात झाडं होती.” तिथल्या डोंगराळ प्रदेशात खासकरून पाईन, ओक आणि एलोन जातीच्या वृक्षांचं प्रमाण जास्त होतं. तसंच, मध्य पर्वतरांग आणि भूमध्य सागर किनारपट्टी यांच्यामध्ये असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उंबराची झाडंदेखील होती.

‘प्लान्ट्‌स ऑफ द बायबल’ या पुस्तकात सांगितल्यानुसार, इस्राएलमधील काही क्षेत्रात आज झाडं दिसतच नाहीत. याचं कारण हे पुस्तक असं देतं, “लोकांनी जनावरांच्या चाऱ्‍यासाठी, शेतीसाठी, तसंच बांधकाम आणि जळणासाठी लाकूडतोड केली आणि यामुळे हळूहळू तिथली झाडं कमी होत गेली.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा