अनुक्रमणिका
१५ मे २०१५
© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
अभ्यास आवृत्ती
२९ जून, २०१५–५ जुलै, २०१५
सावध राहा—सैतान तुमच्यावर टपून आहे!
पृष्ठ ९ • गीत क्रमांक: ५४, ४३
६-१२ जुलै, २०१५
सैतानाविरुद्धच्या लढाईत तुम्ही विजयी होऊ शकता!
पृष्ठ १४ • गीत क्रमांक: २३, १७
१३-१९ जुलै, २०१५
त्यांनी अभिवचनांवर दृष्टी लावली
पृष्ठ १९ • गीत क्रमांक: ४३, ५५
२०-२६ जुलै, २०१५
आपल्या निर्माणकर्त्याचं अनुकरण करा
पृष्ठ २४ • गीत क्रमांक: १२, ११
अभ्यास लेख
▪ सावध राहा—सैतान तुमच्यावर टपून आहे!
▪ सैतानाविरुद्धच्या लढाईत तुम्ही विजयी होऊ शकता!
बायबलमध्ये सैतानाची तुलना गर्जणाऱ्या सिंहाशी करण्यात आली आहे. असा सिंह जो नेहमी भक्षाच्या शोधात असतो. तो शक्तिशाली, क्रूर आणि दिशाभूल करणारा आहे. आपण या दुष्ट शत्रूचा प्रतिकार का केला पाहिजे हे या लेखांतून आपल्याला समजेल. तसंच, आपण स्वतःला त्याच्या पाशांतून कसं वाचवू शकतो हेदेखील आपल्याला समजेल.
▪ त्यांनी अभिवचनांवर दृष्टी लावली
▪ आपल्या निर्माणकर्त्याचं अनुकरण करा
न पाहिलेल्या गोष्टींचं चित्र डोळ्यांपुढे उभं करण्याची क्षमता यहोवानं आपल्याला दिली आहे. या क्षमतेचा आपण एकतर चांगला किंवा वाईट उपयोग करू शकतो. या दोन लेखांत आपण बायबलच्या काळातील काही लोकांच्या उदाहरणांवर चर्चा करू या. आणि कल्पना करण्याच्या आपल्या क्षमतेचा उपयोग आपला विश्वास मजबूत करण्यासाठी कसा करता येईल हे त्यांच्या उदाहरणांवरून पाहू या. तसंच, या क्षमतेमुळे आपल्याला यहोवाच्या प्रेमळपणाचं, दयाळूपणाचं, समजबुद्धीचं आणि आनंदाचं अनुकरण कसं करता येईल हेदेखील आपण पाहू या.
मुखपृष्ठ: दोन बांधव एका स्थानिक व्यक्तीसोबत बायबल अभ्यास करताना
अर्मिनिया
लोकसंख्या:
३०,२६,९००
प्रचारक:
११,१४३
सामान्य पायनियर:
२,२०५
२३,८४४
१४ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या स्मारकविधीसाठी उपस्थित राहिलेल्यांची संख्या प्रचारकांच्या संख्येहून दुप्पट होती