वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 ७/१५ पृ. २६
  • नियमन मंडळाचे एक नवीन सदस्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियमन मंडळाचे एक नवीन सदस्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • नियमन मंडळाचे नवीन सदस्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • नियमन मंडळाचे नवीन सदस्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • नियमन मंडळाचे एक नवीन सदस्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • इतिहास घडवणारी एक सभा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 ७/१५ पृ. २६

नियमन मंडळाचे एक नवीन सदस्य

५ सप्टेंबर २०१२ रोजी, बुधवारी सकाळी अमेरिका व कॅनडा येथील बेथेल कुटुंबांत अशी घोषणा करण्यात आली, की यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळात एका नवीन सदस्याची भर पडली आहे. १ सप्टेंबर २०१२ पासून, मार्क सँडरसन हे नियमन मंडळाचे सदस्य म्हणून सेवा करू लागले.

बंधू सँडरसन, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डिएगो शहरात लहानाचे मोठे झाले. त्यांचे संगोपन ख्रिस्ती कुटुंबात झाले. ९ फेब्रुवारी १९७५ रोजी त्यांचा बाप्तिस्मा झाला. १ सप्टेंबर १९८३ रोजी, कॅनडातील सॅस्केचिवन प्रांतात ते पायनियर सेवा करू लागले. १९९० च्या डिसेंबर महिन्यात, अमेरिकेत झालेल्या सेवा प्रशिक्षण प्रशालेच्या (ज्याला आता अविवाहित बांधवांकरता बायबल प्रशाला असे म्हणतात) सातव्या वर्गातून ते पदवीधर झाले. बंधू सँडरसन यांना एप्रिल १९९१ मध्ये कॅनडातील न्यूफंडलंड बेटावर खास पायनियर म्हणून सेवा करण्यास नेमण्यात आले. बदली विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा केल्यानंतर, फेब्रुवारी १९९७ मध्ये त्यांना कॅनडा बेथेल कुटुंबाचे सदस्य बनण्याचे आमंत्रण मिळाले. नोव्हेंबर २००० मध्ये, अमेरिकेतील शाखा कार्यालयात त्यांची बदली झाली; तेथे त्यांनी ‘इस्पितळ माहिती सेवा’ विभागात आणि नंतर ‘सेवा विभागात’ काम केले.

सप्टेंबर २००८ मध्ये बंधू सँडरसन, शाखा समिती सदस्यांसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहिले आणि त्यानंतर त्यांना फिलिपाईन्सच्या शाखा समितीचे सदस्य म्हणून नेमण्यात आले. सप्टेंबर २०१० मध्ये, त्यांना पुन्हा अमेरिकेत बोलावण्यात आले; तेथे त्यांनी, नियमन मंडळाच्या सेवा समितीचे सहायक म्हणून सेवा केली.

नियमन मंडळाचे सध्याचे सदस्य

मागच्या रांगेत, डावीकडून उजवीकडे: डी.एच.स्प्लेन, ए.मॉरिस तिसरे, डी.एम.सँडरसन, जी.डब्ल्यू.जॅक्सन, एम.एस.लेट्‌. पुढच्या रांगेत, डावीकडून उजवीकडे: एस.एफ.हर्ड, जी.लॉश, जी.एच.पियर्स. नियमन मंडळाचे सर्व सदस्य अभिषिक्‍त ख्रिस्ती आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा