वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 ७/१५ पृ. ३२
  • “व्वा! किती सुरेख चित्र!”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “व्वा! किती सुरेख चित्र!”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • पुढाकार घेणारे ओव्हरसियर —टेहळणी बुरूज अभ्यास घेणारा
    आमची राज्य सेवा—१९९८
  • मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था
    आमची राज्य सेवा—१९९१
  • मंडळीचा पुस्तक अभ्यास शैक्षणिक कार्यहालचालींना चालना देतो
    आमची राज्य सेवा—१९९४
  • तुमच्या आशेच्या जाहीर घोषणेला डगमगू न देता घट्ट धरून ठेवा
    आमची राज्य सेवा—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 ७/१५ पृ. ३२

“व्वा! किती सुरेख चित्र!”

कितीतरी वेळा, टेहळणी बुरूज नियतकालिकाचा नवीन अंक हातात पडताच तुम्ही वरील उद्‌गार काढले असतील. नियतकालिकातील सुरेख चित्रे तयार करण्यासाठी सहसा खूप मेहनत घेतली जाते. ही चित्रे उगीचच दिलेली नसतात. शिकवण्याच्या या प्रभावशाली साधनांचा एक विशिष्ट उद्देश असतो. तो म्हणजे, वाचकाच्या विचारांना व भावनांना चालना देणे. टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करताना व मंडळीत उत्तरे देताना या चित्रांचा आपल्याला विशेष उपयोग होऊ शकतो.

उदाहरणार्थ, प्रत्येक अभ्यास लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या चित्राकडे लक्ष द्या आणि या लेखासाठी हेच चित्र का देण्यात आले असावे यावर विचार करा. त्यात काय दाखवण्यात आले आहे? लेखाच्या शीर्षकाशी किंवा मुख्य शास्त्रवचनाशी त्याचा काय संबंध आहे? त्याच प्रकारे, लेखातील इतर चित्रे विचारात घेताना सदर विषयाशी आणि तुमच्या वैयक्‍तिक जीवनाशी त्यांचा काय संबंध आहे याचा विचार करा.

टेहळणी बुरूज अभ्यास संचालकांनी, बंधुभगिनींना प्रत्येक चित्रावर टिप्पणी करण्याची, म्हणजे लेखाशी त्याचा काय संबंध आहे किंवा व्यक्‍तिगत रीत्या त्यांना या चित्रावरून काय शिकायला मिळाले हे सांगण्याची संधी दिली पाहिजे. काही वेळा, चित्राखाली दिलेल्या मथळ्यासोबत ते चित्र कोणत्या परिच्छेदाशी संबंधित आहे हेदेखील सूचित केलेले असते. असे सूचित केलेले नसते तेव्हा, कोणते चित्र कोणत्या परिच्छेदाची चर्चा करताना विचारात घेतले जावे हे संचालक स्वतः ठरवू शकतात. असे केल्यामुळे, देवाच्या वचनात सांगितलेल्या गोष्टी डोळ्यांपुढे उभ्या करण्यास वाचकाला साहाय्य करण्यासाठी ही जी चित्रे तयार केली जातात त्यांचा पुरेपूर लाभ घेणे सर्वांना शक्य होईल.

एका बांधवाने तर म्हटले: “एखादा सुरेख लेख वाचल्यानंतर त्यातली चित्रं जणू केकवरच्या क्रीमसारखी वाटतात.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा