अनुक्रमणिका
१५ जुलै २०१३
© २०१३ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. सर्वाधिकार स्वाधीन.
अभ्यास आवृत्ती
२-८ सप्टेंबर, २०१३
“या गोष्टी केव्हा होतील, . . . हे आम्हास सांगा”
पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ३२, १०
९-१५ सप्टेंबर, २०१३
“पाहा, . . . मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे”
पृष्ठ ९ • गीत क्रमांक: ३०, ५
१६-२२ सप्टेंबर, २०१३
मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्न पुरवले जाते
पृष्ठ १५ • गीत क्रमांक: १४, २०
२३-२९ सप्टेंबर, २०१३
विश्वासू व बुद्धिमान दास कोण आहे?
पृष्ठ २० • गीत क्रमांक: १६, ४३
अभ्यास लेख
▪ “या गोष्टी केव्हा होतील, . . . हे आम्हास सांगा”
▪ “पाहा, . . . मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे”
या लेखांत मत्तयाच्या पुस्तकातील २४ व २५ या अध्यायांतील काही भागांची चर्चा करण्यात आली आहे. शेवटल्या काळाविषयी येशूने केलेली भविष्यवाणी आणि गहू व निदणाचा दृष्टान्त यांत सांगितलेल्या घटना केव्हा घडतील याविषयी आपला जो समज होता त्यासंबंधी या लेखांत अनेक सुधारित स्पष्टीकरणे देण्यात आली आहेत. तसेच, या स्पष्टीकरणांतून आपण वैयक्तिक रीत्या काय शिकू शकतो हेदेखील यांत सांगितले आहे.
▪ मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्न पुरवले जाते
▪ विश्वासू व बुद्धिमान दास कोण आहे?
लोकसमुदायांना अन्न पुरवण्याच्या बाबतीत असो, किंवा आपल्या अनुयायांना आध्यात्मिक अन्न पुरवण्याच्या बाबतीत असो, येशूने एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब केला. त्याने मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्न पुरवले. पहिल्या शतकात त्याने कोणत्या मोजक्या लोकांद्वारे आपल्या अभिषिक्त अनुयायांचे भरणपोषण केले याविषयी पहिल्या लेखात चर्चा केली आहे. तर दुसऱ्या लेखात पुढील महत्त्वाच्या प्रश्नाचे परीक्षण करण्यात आले आहे: आज ज्यांच्याद्वारे ख्रिस्त आपल्याला आध्यात्मिक अन्न पुरवत आहे ते मोजके लोक कोण आहेत?
मुखपृष्ठ: रूआंडा देशातील रुंडा प्रदेशात बुकिम्बा येथे घरोघरचे साक्षकार्य
रूआंडा
रूआंडातील एकूण साक्षीदारांपैकी एक चतुर्थांश साक्षीदार कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पायनियर सेवेत सहभागी आहेत आणि उरलेले इतर आवेशी साक्षीदार दर महिन्याला सेवाकार्यात सरासरी २० तास खर्च करतात
साक्षीदार
२२,७३४
बायबल अभ्यास
५२,१२३
२०१२ सालची स्मारकविधीची उपस्थिती
६९,५८२