वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 ३/१५ पृ. २९
  • हे विधान जोसिफसनेच केले होते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हे विधान जोसिफसनेच केले होते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • योसेफसचा अत्यंत मोहक कालवृत्तांत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • तुम्हाला माहीत होते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • येशू ख्रिस्त तो पृथ्वीवर येऊन गेल्याचा पुरावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • येशूविषयीच्या शंका समर्थित आहेत का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 ३/१५ पृ. २९

हे विधान जोसिफसनेच केले होते का?

पहिल्या शतकातील इतिहासकार फ्लेवियस जोसिफसने ज्यूईश अँटिक्विटीज याच्या विसाव्या पुस्तकात, “ख्रिस्त म्हटला जाणारा येशू याचा भाऊ याकोब” याच्या मृत्यूविषयी लिहिले. बरेच विद्वान या विधानाला विश्‍वसनीय मानतात. पण, याच लिखाणातील येशूविषयी असलेल्या दुसऱ्‍या एका विधानाच्या विश्‍वसनीयतेवर काही विद्वानांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. टेस्टिमोनियम फ्लॅव्हियानम या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या या उताऱ्‍यात असे म्हटले आहे:

“या काळादरम्यान येशू नावाचा एक बुद्धिमान मनुष्य—त्याला मनुष्य म्हणणे योग्य असल्यास—होता. त्याने बरीच अद्‌भुत कार्ये केली, आणि अनेक लोक त्याच्या शिकवणी आनंदाने ऐकायचे. त्याने बऱ्‍याच यहुदी व परराष्ट्रीय लोकांना आपल्या शिकवणींनी आकर्षित केले. तो ख्रिस्त होता; आणि पिलाताने आमच्यातील इतर मुख्य पुरुषांसोबत सल्लामसलत करून त्याला क्रुसावर चढवले तेव्हा येशूच्या सुरुवातीच्या शिष्यांनी त्याचा त्याग केला नाही. संदेष्ट्यांनी देवप्रेरणेने आधीच भाकीत केल्याप्रमाणे येशू तिसऱ्‍या दिवशी उठून त्याच्या शिष्यांना भेटला. त्याच्याविषयी अशा दहा हजार अद्‌भुत गोष्टी संदेष्ट्यांनी आधीच भाकीत करून ठेवल्या होत्या; आणि ज्यांना ख्रिस्ताच्या नावावरून ख्रिस्ती असे म्हणण्यात आले, ते लोक आजही अस्तित्वात आहेत.”—जोसिफस—द कंप्लीट वर्क्स, विलियम व्हिसटन यांनी भाषांतरित केलेले.

या उताऱ्‍याला विश्‍वसनीय मानणाऱ्‍यांमध्ये आणि हा उतारा जोसिफसने लिहिलेला नाही असा विचार करणाऱ्‍यांमध्ये १६ व्या शतकाच्या शेवटापासून वाद सुरू आहे. फ्रेंच इतिहासकार आणि पुरातन काळातील साहित्याचे तज्ज्ञ सेर्झ बारडे यांनी, मागील चार शतकांपासून चालत आलेला गुंतागुंतीचा हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपले संशोधन ‘द टेस्टिमोनियम फ्लॅव्हियानम—एक ऐतिहासिक विश्‍लेषण’ या फ्रेंच भाषेतील पुस्तकात प्रसिद्ध केले आहे.

जोसिफस हा एक ख्रिस्ती लेखक नव्हता, तो एक यहुदी इतिहासकार होता. त्यामुळे हा वाद मुळात जोसिफसने येशूला जे “ख्रिस्त” म्हणून संबोधले त्यावर आधारित आहे. संशोधनात बारडे यांनी असे सांगितले की जोसिफसने हे लिखाण ग्रीक भाषेत केले असल्यामुळे त्याने येशूला “ख्रिस्त” म्हणून संबोधण्याची पूर्ण शक्यता आहे. खरेतर यावरून हे सिद्ध होते की येशू एक ऐतिहासिक व्यक्‍ती आहे आणि जोसिफसने लिहिलेल्या या उताऱ्‍यावरून टीकाकारांनी ही गोष्ट ओळखायला हवी.

जोसिफसच्या लिखाणातील या उताऱ्‍याची नक्कल करून दुसऱ्‍या एका लेखकाने त्या विधानात फेरबदल केला असेल का? ऐतिहासिक पुराव्यांवरून आणि लेखनशैलीच्या अभ्यासावरून बारडे यांनी असा निष्कर्ष काढला की जोसिफसच्या लेखनशैलीची इतक्या जवळून नक्कल करणे जवळजवळ अशक्य आहे. कारण जोसिफसची लेखनशैली इतर लेखकांच्या तुलनेत खूप वेगळी होती.

तर मग हा सगळा वादविवाद कशासाठी? या वादाचे मूळ लक्षात घेता बारडे यांनी असे सांगितले की “पुरातन काळातील इतर लिखाणांच्या तुलनेत फक्‍त टेस्टिमोनियम या उताऱ्‍याविषयी शंका घेतली जाते कारण इतिहासकारांनी फक्‍त याच लिखाणाच्या विश्‍वसनीयतेवर प्रश्‍न उपस्थित केला आहे.” ते पुढे असे सांगतात की अनेक शतकांपासून या लिखाणावर शंका घेतली जाते, कारण येशू हा ख्रिस्त होता हे अनेक इतिहासकार मान्य करू इच्छित नाहीत.

बारडे यांच्या संशोधनामुळे टेस्टिमोनियम फ्लॅव्हियानम याबद्दल विद्वानांचे मत बदलेल अथवा नाही हे तर येणारा काळच सांगेल. पण पुरातन ग्रीक-यहुदी धर्म आणि सुरुवातीच्या ख्रिस्ती धर्माचे नावाजलेले तज्ज्ञ पियर झॉल्ट्रें यांनी बारडे यांचा निष्कर्ष स्वीकारला आहे. आतापर्यंत त्यांना असे वाटायचे की टेस्टिमोनियम या उताऱ्‍यात फेरबदल करण्यात आले आहेत. हे विश्‍वसनीय आहे असे मानणाऱ्‍यांची त्यांनी टिंगलदेखील उडवली होती. पण आता त्यांनी स्वतःचे मत बदलले आहे. ते म्हणतात की बारडे यांच्या संशोधनामुळेच त्यांचे मत बदलले आहे. झॉल्ट्रें यांनी तर असे विधान केले आहे की “यापुढे कोणीही हे लिखाण जोसिफसचेच आहे अथवा नाही अशी शंका घेऊ नये.”

अर्थात, येशू हाच ख्रिस्त होता असा विश्‍वास करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांजवळ यापेक्षाही ठोस पुरावा आहे आणि तो म्हणजे बायबलमध्ये सापडणारा पुरावा.—२ तीम. ३:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा