अनुक्रमणिका
१५ एप्रिल २०१२
© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. All rights reserved.
अभ्यास आवृत्ती
अभ्यास लेख
२८ मे २०१२–३ जून २०१२
पित्याला प्रगट करण्यास पुत्र उत्सुक आहे
पृष्ठ ३ • गीत क्रमांक: २७, २
४-१० जून २०१२
विश्वासघात—शेवटल्या काळातील एक अनिष्ट प्रघात!
पृष्ठ ८ • गीत क्रमांक: १८, ३२
११-१७ जून २०१२
पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करत राहा
पृष्ठ १३ • गीत क्रमांक: ५२, २२
१८-२४ जून २०१२
आपल्या लोकांना कसे सोडवावे हे यहोवाला कळते
पृष्ठ २२ • गीत क्रमांक: ४९, ३३
२५ जून २०१२–१ जुलै २०१२
तारण प्राप्त होण्यासाठी यहोवा आपले रक्षण करतो
पृष्ठ २७ • गीत क्रमांक: १५, २३
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १ पृष्ठे ३-७
येशूने त्याच्या पित्याला कोणत्या दोन मुख्य मार्गांनी आपल्या शिष्यांसमोर व इतरांसमोर प्रगट केले? पित्याला इतरांसमोर प्रगट करण्याच्या बाबतीत आपण येशूचे अनुकरण कसे करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील.
अभ्यास लेख २ पृष्ठे ८-१२
आजच्या या जगात सगळीकडे विश्वासघात पाहायला मिळतो, पण त्यामुळे ख्रिस्ती कुटुंबातील व मंडळीतील शांती व एकता भंग होऊ नये म्हणून आपण जपले पाहिजे. आपण देवाला व एकमेकांना कायम एकनिष्ठ राहू शकतो हे या लेखात दाखवले आहे.
अभ्यास लेख ३ पृष्ठे १३-१७
आपण पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करत आहोत हे आपण कसे दाखवू शकतो? आपण कोणत्या धोक्यापासून आपल्या हृदयाचे रक्षण केले पाहिजे? आणि यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील.
अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २२-३१
“मोठे संकट” सुरू असेल त्या काळादरम्यान देवाच्या लोकांवर चहुबाजूंनी हल्ला केला जाईल. (मत्त. २४:२१) पण, यहोवा आपल्याला सोडवेल असा भरवसा आपण का बाळगू शकतो? जगाच्या अंताची वाट पाहत असताना आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यास तो कशा प्रकारे आपल्याला साहाय्य करेल? आपला विश्वास बळकट करतील अशी उत्तरे या दोन लेखांत तुम्हाला सापडतील.
याच अंकात
१८ सत्तर वर्षांपासून मी एका यहुद्याचा पदर धरून आहे
मुखपृष्ठ: कॅनडा येथील नुनावूत प्रदेशात, इकॅलूइट शहरातील फ्रोबिशेर खाडीच्या गोठलेल्या किनाऱ्यावर एक बहीण इनुक्टिटूट भाषेत माहितीपत्रक देताना
कॅनडा
लोकसंख्या
३,४०,१७,०००
प्रचारक
१,१३,९८९
भाषांतराचे काम
कॅनडातील शाखा १२ स्थानिक भाषांतील भाषांतराच्या कामाची देखरेख करते