अनुक्रमणिका
१५ डिसेंबर २०११
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
३० जानेवारी, २०१२–५ फेब्रुवारी, २०१२
तो तुमच्याकरता चांगले उदाहरण आहे की वाईट?
पृष्ठ ८
६-१२ फेब्रुवारी, २०१२
देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार का चालावे?
पृष्ठ १३
१३-१९ फेब्रुवारी, २०१२
प्राचीन काळातील विश्वासू जन देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालले
पृष्ठ १८
२०-२६ फेब्रुवारी, २०१२
देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित—पहिल्या शतकात आणि आज
पृष्ठ २२
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १ पृष्ठे ८-१२
बायबलमध्ये उल्लेखिलेल्या काही लोकांनी आपल्याकरता चांगले उदाहरण मांडण्यासोबतच वाईट उदाहरणही मांडले आहे, ज्यापासून आपण काही धडे शिकू शकतो. शलमोनाने मांडलेल्या दोन्ही प्रकारच्या उदाहरणांचे परीक्षण करण्यास हा लेख आपल्याला मदत करेल. आपण शलमोनापासून असे काय शिकू शकतो ज्यामुळे आपल्याला ख्रिस्ती या नात्याने जीवन जगण्यास मदत मिळेल?
अभ्यास लेख २ पृष्ठे १३-१७
या विश्वात अशी एक सामर्थ्यशाली शक्ती आहे, जी या दुष्ट जगात यशस्वीपणे जीवन जगण्यास आपले मार्गदर्शन करू शकते. ती कोणती शक्ती आहे? आपण त्या शक्तीच्या मार्गदर्शनानुसार का चालले पाहिजे? आणि त्या शक्तीच्या प्रभावापासून पूर्ण लाभ घेण्याकरता आपण काय करू शकतो?
अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे १८-२६
गतकाळात देवाचे अनेक सेवक पवित्र आत्म्याने पूर्ण होते. देवाच्या आत्म्याने त्यांच्यावर कोणकोणत्या मार्गांनी कार्य केले? यहोवाने कशा प्रकारे त्यांचे मार्गदर्शन केले याचा अभ्यास केल्याने देवाची सेवा करत राहण्यास आपल्याला खूप प्रोत्साहन मिळेल.
याच अंकात
३ बदल करण्यास तयार असल्यामुळे माझं जीवन समृद्ध झालं
२७ आजारपणामुळे आपला आनंद गमावू नका
३२ टेहळणी बुरूज २०११ विषय सूची