अनुक्रमणिका
१५ ऑक्टोबर २०११
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
२८ नोव्हेंबर, २०११–४ डिसेंबर, २०११
तुम्ही जी करमणूक निवडता ती हितकारक आहे का?
पृष्ठ ८
५-११ डिसेंबर, २०११
विवाहित व अविवाहित स्थितीविषयी सुज्ञ सल्ला
पृष्ठ १३
१२-१८ डिसेंबर, २०११
“सर्व सांत्वनदाता देव” यहोवा याच्यावर भरवसा ठेवा
पृष्ठ २३
१९-२५ डिसेंबर, २०११
‘सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करा’
पृष्ठ २७
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १ पृष्ठे ८-१२
आपण जगात कोठेही राहत असलो, तरी आपल्याला हितकारक ठरेल अशा प्रकारचे मनोरंजन निवडण्यास बायबलची तत्त्वे आपल्याला मदत करू शकतात. एखादे मनोरंजन निवडण्याआधी ते आपल्यासाठी योग्य आहे की नाही याची पारख कशी करता येईल याची चर्चा या लेखात केली जाईल.
अभ्यास लेख २ पृष्ठे १३-१७
लग्न करावे की अविवाहित राहावे याविषयी एक व्यक्ती जो निर्णय घेते त्याचा केवळ तिच्या संपूर्ण जीवनावरच नव्हे, तर यहोवासोबतच्या तिच्या नातेसंबंधावरही परिणाम होतो. तेव्हा, यहोवाचे सर्व सेवक, मग ते विवाहित असोत अथवा अविवाहित, जीवनातील या महत्त्वपूर्ण विषयाच्या बाबतीत १ करिंथकर ७ व्या अध्यायात असलेल्या सल्ल्याचे कशा प्रकारे पालन करू शकतात ते या लेखात दाखवले जाईल.
अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे २३-३१
या शेवटल्या दिवसांत, यहोवाच्या सेवकांना व इतरांना जीवनात अनेकदा दुःखद प्रसंगांचा सामना करावा लागतो. जीवनात कोणते दुःखाचे प्रसंग येऊ शकतात? अशा वेळी आवश्यक असलेले सांत्वन कोठे मिळू शकते? या संकटमय काळात, यहोवा आणि त्याचे साक्षीदार कशा प्रकारे लोकांचे सांत्वन करतात हे या दोन लेखांत सांगितले आहे.
याच अंकात
३ ‘जागृत राहणे’—इतके महत्त्वाचे का?
५ आपण सर्व एकत्र मिळून आनंद करू या!
१८ यहोवाची सेवा करण्यात मला नेहमीच आनंद मिळाला
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Globe: Courtesy of Replogle Globes