अनुक्रमणिका
१५ एप्रिल २०११
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
३० मे, २०११–५ जून, २०११
पृष्ठ ९
६-१२ जून, २०११
देवाचा सन्मान होईल असे निर्णय घ्या
पृष्ठ १३
१३-१९ जून, २०११
“आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ” देवाचा गौरव करते
पृष्ठ १८
२०-२६ जून, २०११
तुम्ही देवाच्या आत्म्याला तुमचे मार्गदर्शन करू देत आहात का?
पृष्ठ २३
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १ पृष्ठे ९-१३
आपण अशा एक जगात राहत आहोत जेथे बहुतेक लोक आपल्या जबाबदाऱ्यांचा गांभीर्याने विचार करत नाहीत. खऱ्या ख्रिश्चनांनी मात्र आपल्या जबाबदाऱ्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. ही गोष्ट, यहोवाच्या उपासनेच्या बाबतीत विशेष महत्त्वाची आहे. आपण आपल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्यांकडे किती गांभीर्याने पाहिले पाहिजे याबद्दल एक संतुलित व शास्त्रवचनीय दृष्टिकोन या लेखात सादर केला जाईल.
अभ्यास लेख २ पृष्ठे १३-१७
अनेकांना निर्णय घेणे कठीण वाटते. चांगले निर्णय घेण्यास शिकणे का महत्त्वाचे आहे याचे परीक्षण करण्यासाठी हा लेख आपल्याला मदत करेल. तसेच, आपण घेतलेल्या निर्णयांमुळे देवाचा सन्मान होईल याची खातरी करण्यासाठी आपण कोणते व्यावहारिक मार्ग अवलंबू शकतो याबद्दलही या लेखात चर्चा केली जाईल.
अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे १८-२७
‘आत्म्याचे फळ’ काय आहे? आपण ते कसे विकसित करू शकतो? आणि आपण ते का विकसित केले पाहिजे? या प्रश्नांची उत्तरे, आत्म्याच्या फळाच्या नऊ पैलूंची चर्चा करताना तुम्हाला मिळतील. तसेच, काही व्यावहारिक सूचनादेखील या लेखांत दिल्या आहेत ज्या अनेकांना साहाय्यक ठरतील.
याच अंकात
३ देव तुम्हाला मार्गदर्शित करत असल्याचा पुरावा तुम्ही पाहता का?
६ अप्रामाणिक जगात प्रामाणिक कसे राहावे?
२९ मी अनेक चांगल्या गोष्टी अनुभवल्या आहेत