अनुक्रमणिका
१५ फेब्रुवारी २०११
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
४-१० एप्रिल, २०११
पवित्र आत्मा—सृष्टिकार्यातील त्याची भूमिका
पृष्ठ ६
११-१७ एप्रिल, २०११
देवाची कृपापसंती प्राप्त केल्याने सार्वकालिक जीवन मिळते
पृष्ठ १३
१८-२४ एप्रिल, २०११
नीतिमत्त्वावर मनापासून प्रेम करा
पृष्ठ २४
२५ एप्रिल, २०११–१ मे, २०११
तुम्ही स्वैराचाराचा द्वेष करता का?
पृष्ठ २८
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १ पृष्ठे ६-१०
स्वर्ग आणि पृथ्वी यांची सृष्टी करण्यासाठी देवाने आपल्या पवित्र आत्म्याचा कशा प्रकारे उपयोग केला याबद्दलची आपली समज वाढवण्यास या लेखात सादर केलेले मुद्दे आपली मदत करतील. यहोवा आपला बुद्धिमान व शक्तिशाली सृष्टिकर्ता आहे यावरील आपला भरवसादेखील या लेखाच्या अभ्यासातून आणखी मजबूत होईल.
अभ्यास लेख २ पृष्ठे १३-१७
जगातील लोकांना सामान्यतः भौतिक किंवा आर्थिक सुरक्षेची सगळ्यात जास्त चिंता वाटते. पण, बायबल आपल्याला सांगते की देवाची कृपापसंती प्राप्त करण्याची आपल्याला अधिक चिंता वाटली पाहिजे. आपण यहोवावर भरवसा करायला शिकले पाहिजे यावर हा लेख भर देतो आणि त्याची कृपापसंती आपल्यावर आहे याची खातरी बाळगण्यासाठी आपण कोणती पावले उचलू शकतो हेदेखील यात दाखवण्यात आले आहे.
अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे २४-३२
‘येशूला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे.’ (इब्री १:९) याबाबतीत आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो हे या लेखांत सांगण्यात आले आहे. नीतिमत्त्वाबद्दल प्रेम आणि स्वैराचाराबद्दल द्वेष विकसित करण्यास शिकणे का महत्त्वाचे आहे हे या लेखांत दाखवण्यात आले आहे.
याच अंकात
३ तुमच्या मुलांना इतरांचा आदर करण्यास शिकवा
१८ तुम्हाला मिळणारे आशीर्वाद तुम्हाला खरोखर मौल्यवान वाटतात का?
२१ “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे”