अनुक्रमणिका
ऑक्टोबर १५, २०१०
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
नोव्हेंबर २९, २०१०–डिसेंबर ५, २०१०
पृष्ठ ३
गीत क्रमांक: ११, ५१
डिसेंबर ६-१२, २०१०
तुम्ही पहिल्याने “त्याचे नीतिमत्त्व” मिळवण्यास झटा
पृष्ठ ७
गीत क्रमांक: ४०, २२
डिसेंबर १३-१९, २०१०
आपल्या बंधुभगिनींचा आदर करण्यात तुम्ही पुढाकार घेता का?
पृष्ठ १६
गीत क्रमांक: ३१, ९
डिसेंबर २०-२६, २०१०
ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्यासाठी तुम्ही योगदान करता का?
पृष्ठ २०
गीत क्रमांक: २०, ३४
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११
येशूच्या कार्यांचे अनुकरण करण्याद्वारे आपण यहोवासोबत जवळचा नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न कसा करू शकतो याचे या दोन लेखांत परीक्षण करण्यात आले आहे. तसेच, देवाच्या नीतिमत्त्वात काय समाविष्ट आहे, पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास आपण का झटले पाहिजे आणि आपण केव्हाही आपल्या स्वतःच्या स्तरांनुसार यहोवाचा न्याय का करू नये हेही या लेखांत स्पष्ट करण्यात आले आहे.
अभ्यास लेख ३ पृष्ठे १६-२०
आपल्या सहविश्वासू बंधुभगिनींना आदर दाखवण्यात काय समाविष्ट आहे? असे करण्याची आपल्याजवळ कोणती कारणे आहेत? आपण स्वतः आदर दाखवण्यात पुढाकार कसा घेऊ शकतो? अशा काही प्रश्नांची चर्चा या लेखात करण्यात आली आहे.
अभ्यास लेख ४ पृष्ठे २०-२५
सभेत उपस्थित असणाऱ्या सर्वांसाठीच आपल्या सभा उभारणीकारक असाव्यात म्हणून सभा चालवणारे बांधव व सभेला उपस्थित असलेले सर्व जण काय करू शकतात याची चर्चा या लेखात करण्यात आली आहे. तसेच, या नियतकालिकात करण्यात आलेल्या काही फेरबदलांची चर्चादेखील या लेखात करण्यात आली आहे.
याच अंकात:
कारणे सांगणे—याकडे यहोवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? १२
यहोवाच्या संघटनेशी परिचित होण्यास मुलांना मदत करा २५
यहोवाच्या संघटनेत स्वतःला व्यस्त ठेवणे २९
“लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहचण्यास ही पुस्तिका मला मदत करते” ३२