वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 ४/१ पृ. ३०-३१
  • येशू आज्ञाधारकपणा शिकला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू आज्ञाधारकपणा शिकला
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • मिळती जुळती माहिती
  • येशूनं नेहमी ऐकलं
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • तिला यहोवाची उदंड कृपा लाभली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “पाहा! मी प्रभूची दासी!”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तिनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 ४/१ पृ. ३०-३१

आपल्या मुलांना शिकवा

येशू आज्ञाधारकपणा शिकला

आज्ञाधारक राहायला तुला काही वेळा कठीण वाटते का?—a जर वाटते तर, ही काही आश्‍चर्याची गोष्ट नाही. सर्वांनाच काही वेळा आज्ञेत राहायला कठीण वाटते. तुला माहीत आहे का, येशूलाही आज्ञेत राहायला शिकावे लागले होते?—

सर्व लहान मुलांनी कोणाच्या आज्ञेत राहिले पाहिजे?— अगदी बरोबर, आपल्या आई-बाबांच्या. बायबलमध्ये सांगितले आहे: “प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा.” (इफिसकर ६:१) येशूचे बाबा किंवा वडील कोण होते?— यहोवा देव. आणि ते आपलेही वडील आहेत. (मत्तय ६:९, १०) पण योसेफ त्याचे बाबा होते आणि मरीया त्याची आई होती असे जर तू म्हणत असशील तरीही तू बरोबरच आहेस. ते त्याचे आईबाबा कसे झाले माहीत आहे?—

मरीयाचा कोणत्याही पुरुषाशी लैंगिक संबंध आला नव्हता तरीपण ती आई बनणार आहे, असे गब्रीएल देवदूताने तिला सांगितले. यहोवा हे गरोदरपण एका चमत्काराद्वारे घडवून आणणार होता. गब्रीएल देवदूताने मरीयेला असे म्हटले: “परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; ह्‍या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र असे म्हणतील.”—लूक १:३०-३५.

देवाने स्वर्गातील त्याच्या पुत्राचा जीव मरीयेच्या गर्भात टाकला. जसे इतर मातांच्या गर्भात बाळ वाढते तसेच येशूचा जीव मरीयेच्या पोटात वाढू लागला. आणि नऊ महिन्यांनंतर येशूचा जन्म झाला. तोपर्यंत योसेफाचे मरीयेशी लग्न झाले व त्यामुळे बहुतेक लोकांना असे वाटले, की योसेफच येशूचे खरे वडील होते. खरे तर योसेफ येशूचे दत्तक वडील होते. म्हणजे, येशूला दोन वडील होते, असेही आपण म्हणू शकतो!

येशू १२ वर्षांचा होता तेव्हा त्याने असे काही तरी केले ज्यावरून स्वर्गातील त्याच्या वडिलांवर अर्थात यहोवा देवावर त्याचे किती प्रेम होते हे दिसून आले. येशू आपल्या कुटुंबासोबत नेहमीप्रमाणे लांबचा प्रवास करून जेरूसलेमला वल्हांडण सण साजरा करायला गेला होता. आणि घरी नासरेथला परतताना, येशू आपल्यासोबत नाही हे योसेफ आणि मरीयेच्या लक्षात आले नाही. ते त्याला कसे काय विसरून गेले होते?—

योसेफ व मरीयेला आणखी मुले झाली होती. (मत्तय १३:५५, ५६) आणि प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईकही होते. जसे की याकोब, योहान, त्यांचे वडील जब्दी व आई सलोमी जी कदाचित मरीयेची बहीण होती. तर मरीयेला वाटले, की येशू कदाचित या नातेवाईकांबरोबर असेल.—मत्तय २७:५६; मार्क १५:४०; योहान १९:२५.

पण मग जेव्हा योसेफ व मरीयेच्या लक्षात आले, की येशू त्यांच्या नातेवाईकांबरोबरसुद्धा नाही तेव्हा ते पुन्हा जेरूसलेमला घाईघाईने गेले. त्यांनी अख्खे जेरूसलेम पालथे घातले. तिसऱ्‍या दिवशी तो त्यांना मंदिरात दिसला. मरीया त्याला म्हणाली: “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.” पण येशू तिला म्हणाला: “तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?”—लूक २:४५-५०.

तुला काय वाटते, येशूने आपल्या आईशी असे बोलणे बरोबर होते का?— येशूला मंदिरात उपासनेला जायला खूप आवडायचे हे योसेफ व मरीयेला चांगल्या प्रकारे माहीत होते. (स्तोत्र १२२:१) त्यामुळे सर्वात आधी त्यांनी त्याला देवाच्या मंदिरात शोधायला हवे होते, असा येशूने विचार करणे बरोबर नव्हते का?— नंतर मरीयेने येशूच्या बोलण्यावर विचार केला.

पण मग येशू योसेफ व मरीया यांच्यासोबत कसा वागायचा?— बायबलमध्ये म्हटले आहे: “[येशू] त्यांच्याबरोबर खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला.” (लूक २:५१, ५२) येशूच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो बरे?— हेच की आपणही आपल्या आईबाबांच्या आज्ञेत राहिले पाहिजे.

पण येशूला नेहमीच आज्ञेत राहणे, अगदी त्याच्या स्वर्गीय पित्याच्याही आज्ञेत राहणे सोपे नव्हते.

यहोवाने येशूला जे काम करायला सांगितले होते त्याबद्दल यहोवाचे मन बदलले आहे का, असे येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री यहोवाला विचारले देखील होते! (लूक २२:४२) सोपे नसतानाही येशू देवाच्या आज्ञेत राहिला. “त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला,” असे बायबलमध्ये म्हटले आहे. (इब्री लोकांस ५:८) आपणही आज्ञाधारक राहण्यास म्हणजे आपल्याला कठीण असते तेव्हाही आज्ञाधारक राहण्यास शिकू शकतो का?— (w१०-E ०४/०१)

[तळटीप]

a तुम्ही हा लेख आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, लेखात काही वाक्यांच्या पुढे जेव्हा एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही तेथे थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते विचारायचे आहे.

प्रश्‍न:

▪ मरीया येशूची आई कशी बनली आणि येशूला दोन वडील होते असे आपण का म्हणू शकतो?

▪ येशू मागे राहिला होता हे त्याच्या आईबाबांच्या लक्षात का आले नाही?

▪ येशूच्या आईबाबांनी त्याला आधी कोठे शोधायला हवे होते, असे त्याला वाटले?

▪ येशूच्या उदाहरणावरून तू काय शिकू शकतो?

[३१ पानांवरील चित्र]

योसेफ व मरीया यांनी येशूला आधी मंदिरात शोधायला हवे होते, असे तुला का वाटते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा