देवाबद्दल तुम्हाला कितपत माहीत आहे?
या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कसे द्याल? काहींना वाटते की त्यांना देवाविषयी भरपूर माहीत आहे. त्यांना तो एका जिवलग मित्रासारखा वाटतो. आणखी काहींना तो दूरच्या एका नातेवाईकासारखा वाटतो. देव अस्तित्वात असल्याचे ते मानतात पण त्याच्याबद्दल त्यांना काही माहीत नसते. तुमचा देवावर विश्वास असल्यास तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरे कशी द्याल?
१. देव एक व्यक्ती आहे का?
२. देवाला नाव आहे का?
३. येशू सर्वशक्तिमान देव आहे का?
४. देवाला माझी काळजी आहे का?
५. कोणत्याही प्रकारे केलेली उपासना देवाला मान्य आहे का?
तुम्ही लोकांना या प्रश्नांची उत्तरे विचारल्यास, तुम्हाला इतकी भिन्न भिन्न उत्तरे मिळतील, की तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. म्हणूनच तर, देवाविषयी इतक्या मिथ्याकथा व चुकीच्या कल्पना निर्माण झाल्या आहेत.
उत्तरे शोधून काढणे महत्त्वाचे आहे
येशू ख्रिस्त एकदा विहिरीजवळ एका देवभीरू स्त्रीबरोबर बोलत होता. देवाबद्दलचे सत्य माहीत का करून घेतले पाहिजे त्याचे कारण त्याने तिला सांगितले. येशू एक संदेष्टा आहे, हे या शोमरोनी स्त्रीने स्वीकारले. पण एका गोष्टीची तिला रूखरूख लागली होती. तिचा धर्म आणि येशूचा धर्म वेगवेगळा होता. तिने जेव्हा तिच्या मनातील ही रूखरूख येशूला बोलून दाखवली तेव्हा येशूने तिला अगदी उघडपणे म्हटले: “तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता.” (योहान ४:१९-२२) यावरून, सर्वच धार्मिक लोकांना देवाबद्दलची खरी माहिती नाही, या गोष्टीची येशूने तिला जाणीव करून दिल्याचे आपल्याला कळते.
म्हणजे, देवाविषयीची खरी माहिती कोणाकडेही नाही, असा येशूच्या बोलण्याचा अर्थ होता का? नाही. येशूने पुढे या स्त्रीला असे म्हटले: “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे.” (योहान ४:२३) देवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करणाऱ्यांपैकी तुम्ही आहात का?
या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत असणे अतिशय महत्त्वाचे आहे. का महत्त्वाचे आहे? येशूने देवाला प्रार्थना केली तेव्हा त्याने अचूक ज्ञान घेण्याच्या महत्त्वावर जोर देत असे म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) देवाविषयीचे सत्य माहीत करून घेण्यावरच तुमचे भवितव्य अवलंबून आहे!
पण देवाविषयीचे सत्य माहीत करून घेणे खरोखर शक्य आहे का? होय, शक्य आहे. कसे शक्य आहे ते येशूने स्वतःबद्दल जे म्हटले त्यावरून कळते: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहान १४:६) त्याने असेही म्हटले: “पिता कोण आहे हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.”—लूक १०:२२.
यावरून कळते, की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने दिलेल्या शिकवणीवरून आपल्याला देवाबद्दलचे सत्य माहीत करून घेता येते. येशू आपल्याला असे वचन देतो: “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील.”—योहान ८:३१, ३२.
तर मग वर उल्लेख केलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे येशूने कशी दिली? (w०९ २/१)
[४ पानांवरील चित्र]
तुम्ही अशा देवाची उपासना करत आहात का ज्याच्याविषयीची खरी माहिती तुमच्याजवळ नाही?