अनुक्रमणिका
नोव्हेंबर १५, २००८
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
जानेवारी ५-११
कळपापासून भटकलेल्यांना मदत करा
पृष्ठ ८
गीत क्रमांक: ११ (८५), २८ (२२४)
जानेवारी १२-१८
लवकरात लवकर परतण्यासाठी त्यांना साहाय्य करा!
पृष्ठ १२
गीत क्रमांक: २३ (२००), २२ (१३०)
जानेवारी १९-२५
आरोग्याची निगा राखा, पण बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहून
पृष्ठ २३
गीत क्रमांक: ६ (४५), २४ (१८५)
जानेवारी २६-फेब्रुवारी १
येशूप्रमाणे तुम्हीही “सैतानाला अडवा”
पृष्ठ २७
गीत क्रमांक: ५ (४६), २१ (१९१)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ८-१६
देवाच्या कळपापासून भटकलेल्यांना मंडळीतील वडील व इतर सदस्य कशा प्रकारे साहाय्य करू शकतात हे जाणून घ्या. अक्रियाशील झालेल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल, हे या लेखांत स्पष्ट केले आहे. तसेच, देवाच्या कळपात परत येणारे आपल्या भाऊबहिणींकडून कशा प्रकारच्या वागणुकीची अपेक्षा करू शकतात हे देखील यांत सांगण्यात आले आहे.
अभ्यास लेख ३ पृष्ठे २३-२७
आपल्या आरोग्याबद्दल माफक काळजी करणे स्वाभाविकच आहे. म्हणून, यहोवाचे साक्षीदार वैद्यकीय साहाय्य व इतर प्रकारच्या उपचार पद्धती स्वीकारतात. तरीसुद्धा, याबाबतीत “मर्यादेने” किंवा सुबुद्धीने वागणे गरजेचे आहे. (तीत २:१३) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण आपल्या आध्यात्मिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे व देवासोबतचा आपला नातेसंबंध बळकट केला पाहिजे.
अभ्यास लेख ४ पृष्ठे २७-३१
दियाबलाचा प्रतिकार करण्यात येशूने कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण मांडले त्याबद्दल शिका. येशू सैतानाचा प्रतिकार करेल याची देवाला का खात्री होती हे या लेखात सांगितले आहे. येशूने कशा प्रकारे यशस्वी रीत्या सैतानाचा प्रतिकार केला आणि आज आपणही येशूप्रमाणेच सैतानाचा यशस्वी रीत्या प्रतिकार कसा करू शकतो हेही या लेखात सांगितलेले आहे.
याच अंकात:
तुम्हाला कशा प्रकारची व्यक्ती बनायचे आहे?
पृष्ठ ३
‘एकदिलाने व एकजिवाने’ देवाची सेवा करणे
पृष्ठ ६
‘शांतीला पोषक होणाऱ्या गोष्टींच्या मागे लागा’
पृष्ठ १७
यहोवाचे वचन सजीव आहे—याकोबाच्या आणि पेत्राच्या पत्रांतील ठळक मुद्दे
पृष्ठ २०
‘समुद्राजवळ गायिलेल्या गीताचे’ हस्तलिखित—इतिहासातील दोन कालखंडांना जोडणारा दुवा
पृष्ठ ३२