वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w09 १/१ पृ. १६-१७
  • मृतांसाठी असलेल्या आशेविषयी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मृतांसाठी असलेल्या आशेविषयी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण आजारी का पडतो व मरतो?
  • येशू का मरण पावला?
  • मेल्यानंतर माणसाचे काय होते?
  • मृतांसाठी कोणती आशा आहे?
  • मृत्युच्या वेळी काय होते?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • मरण पावलेल्या तुमच्या प्रिय जनांसाठी खरी आशा
    बायबल नेमके काय शिकवते?
  • आज मृत असणारे लक्षावधी लोक पुन्हा जिवंत होतील
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • मृत्यूमुळे सगळेच संपत नाही!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
w09 १/१ पृ. १६-१७

येशू काय शिकवतो

मृतांसाठी असलेल्या आशेविषयी

येशूने तीन लोकांचे पुनरुत्थान करून हे दाखवून दिले, की मृत लोकांसाठी एक आशा आहे. (लूक ७:११-१७; ८:४९-५६; योहान ११:१-४५) मृत लोकांकरता कोणती आशा आहे हे समजण्याआधी आपण, मनुष्य का मरतो व केव्हापासून मरणाला सुरुवात झाली हे समजून घेतले पाहिजे.

आपण आजारी का पडतो व मरतो?

येशूने लोकांच्या पापांची क्षमा केली तेव्हा त्यांचे आजार बरे झाले. उदाहरणार्थ, अर्धांगवायू झालेल्या एका माणसाला येशूकडे आणले तेव्हा येशू म्हणाला: “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे, किंवा उठून चाल असे बोलणे, ह्‍यातून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हास समजावे म्हणून (मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला) ऊठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा.” (मत्तय ९:२-६) म्हणजे, पापामुळे आपण आजारी पडतो व मरतो. हे पाप आपल्याला पहिला मनुष्य आदाम ह्‍याच्याकडून वारशाने मिळाल्यामुळे आपणही पापी झालो.—लूक ३:३८; रोमकर ५:१२.

येशू का मरण पावला?

येशूने तर कधी पाप केले नव्हते. पण तरीसुद्धा तो मेला. आपल्यासाठी मरण पत्करून त्याने आपल्या पापांची किंमत भरून दिली. त्याने असे म्हटले, की त्याचे रक्‍त ‘पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जाईल.’—मत्तय २६:२८.

त्याने असेही म्हटले: “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मत्तय २०:२८) येशूने जी किंमत भरून दिली त्याला त्याने “खंडणी” म्हटले. कारण या खंडणी बलिदानामुळे इतरांची मृत्यूतून सुटका होते. येशूने असेही म्हटले: “मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.” (योहान १०:१०) मृतांसाठी असलेली आशा पूर्णपणे समजण्याकरता आपण, मृतजन सध्या कोणत्या अवस्थेत आहेत, हेही जाणून घेतले पाहिजे.

मेल्यानंतर माणसाचे काय होते?

येशूचा मित्र लाजर मरण पावला तेव्हा मेल्यानंतर माणसाचे काय होते, हे येशूने स्पष्टपणे दाखवून दिले. त्याने आपल्या शिष्यांना असे म्हटले: “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवावयास [बेथानीस] जातो. . . . परंतु तो झोपेतून मिळणाऱ्‍या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे.” यावरून येशूने स्पष्टपणे दाखवून दिले, की मृत जन गाढ झोपेत असतात; त्यांना कसल्याही प्रकारची जाणीव नसते.—योहान ११:१-१४.

येशूचा मित्र लाजर याला मरून चार दिवस झाले होते. येशूने त्याचे पुनरुत्थान केले. पण लाजरला त्याच्या मृतावस्थेत कोणता अनुभव आला याविषयी बायबलमध्ये काहीही सांगितलेले नाही. मृत अवस्थेत लाजर बेशुद्ध होता. त्याला काहीही माहीत नव्हते.—उपदेशक ९:५, १०; योहान ११:१७-४४.

मृतांसाठी कोणती आशा आहे?

मृत जनांना पुन्हा जिवंत केले जाईल आणि त्यानंतर ते सदासर्वदा जिवंत राहतील. येशूने म्हटले: “कबरेतील सर्व माणसे त्याची [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”—योहान ५:२८, २९.

ही आशा देवाला आपल्याबद्दल असलेल्या प्रेमाचा आणखी एक पुरावा आहे. येशूने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६; प्रकटीकरण २१:४, ५. (w०८ ११/१)

अधिक माहिती हवी असेल तर बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा ६ वा अध्याय पाहा.a

[तळटीप]

a यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा