अनुक्रमणिका
ऑगस्ट १५, २००८
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
सप्टेंबर २९-ऑक्टोबर ५
यहोवा आपल्या भक्तांस कधीही सोडणार नाही
पृष्ठ ३
गीत क्रमांक: २३ (२००), ६ (४५)
ऑक्टोबर ६-१२
एकाग्र चित्ताने यहोवाची एकनिष्ठ भक्ती करत राहा
पृष्ठ ७
गीत क्रमांक: १६ (१४३), २१ (१९१)
ऑक्टोबर १३-१९
सन्माननीय आचरणाने यहोवाचे गौरव करा
पृष्ठ १२
गीत क्रमांक: २२ (१३०), २६ (२१२)
ऑक्टोबर २०-२६
यहोवा आपल्या वयोवृद्ध सेवकांची प्रेमाने काळजी घेतो
पृष्ठ १७
गीत क्रमांक: ७ (५१), ९ (३७)
ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २
तुम्ही “शुद्ध वाणी” अस्खलितपणे बोलत आहात का?
पृष्ठ २१
गीत क्रमांक: १७ (१८७), ११ (८५)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११
इस्राएल गोत्रांचे दोन वेगवेगळ्या राज्यांत विभाजन झाले त्या काळातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, हे लेख दाखवतात की कशा प्रकारे यहोवा आपल्या एकनिष्ठ भक्तांना कधीही सोडत नाही. धनसंपत्तीचा लोभ किंवा गर्विष्ठपणा यांच्या सापळ्यात आपण अडकू नये म्हणून एकाग्र चित्ताने यहोवाची एकनिष्ठ सेवा करत राहणे किती महत्त्वाचे आहे यावर या लेखांत भर देण्यात आला आहे.
अभ्यास लेख ३ पृष्ठे १२-१६
देवाच्या मान व महिम्याची कदर केल्यामुळे आपल्यावर कोणता परिणाम होण्यास हवा हे या लेखात सांगण्यात आले आहे. येशू इतरांशी ज्या प्रकारे वागला त्यावरून देवाच्या मान व महिम्याबद्दल आपल्याला काय शिकता येते याचेही यात परीक्षण केले आहे. तसेच, आपण कशा प्रकारे सन्माननीय रीत्या वागू शकतो हे देखील या लेखात सांगितले आहे.
अभ्यास लेख ४ पृष्ठे १७-२१
वृद्ध ख्रिस्ती बांधवांकडे यहोवाच्या दृष्टिकोनाने पाहायला शिका. त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा आदर करण्याविषयी, त्यांच्या भावना जपून त्यांच्याशी वागण्याविषयी व आध्यात्मिक कार्यांत सक्रिय राहायला त्यांना साहाय्य करण्याविषयी बायबल आपल्याला कोणते मार्गदर्शन देते हे या लेखात सांगितले आहे.
अभ्यास लेख ५ पृष्ठे २१-२५
संदेष्टा सफन्या याच्याद्वारे यहोवाने म्हटले: “मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन.” (सफ. ३:९) ही “शुद्ध वाणी” काय आहे आणि ती अस्खलितपणे बोलण्याकरता तुम्ही कोणती पावले उचलली पाहिजेत हे जाणून घ्या. तसेच या अद्भुत भाषेचा वापर करून तुम्ही यहोवाचा गौरव कसा करू शकता याबद्दलही जाणून घ्या.
याच अंकात:
पृष्ठ २६
पृष्ठ २९
मिशनरी कशा प्रकारे टोळांसारखे आहेत?
पृष्ठ ३०