वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 १०/१ पृ. २४-२५
  • इतरांशी वागण्याविषयी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांशी वागण्याविषयी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण दयाळू का असले पाहिजे?
  • आपण क्षमा का केली पाहिजे?
  • कुटुंबात सुखशांती कशी नांदू शकते?
  • या सिद्धांतांचे आपण पालन का केले पाहिजे?
  • कौटुंबिक जीवन सुखी बनवण्याचा मंत्र
    बायबल नेमके काय शिकवते?
  • “आपसात क्षमा करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवाप्रमाणे तुम्ही क्षमा करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • कौटुंबिक जीवनाविषयी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 १०/१ पृ. २४-२५

येशू काय शिकवतो

इतरांशी वागण्याविषयी

आपण दयाळू का असले पाहिजे?

लोक तुमच्याशी वाईटपणे वागत असले तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याशी चांगले वागता का? आपल्याला जर येशूचे अनुकरण करायचे असेल तर जे आपला द्वेष करतात त्यांच्याशी देखील आपण दयाळुपणे वागले पाहिजे. येशूने म्हटले: “जे तुमच्यावर प्रीति करितात त्यांच्यावर तुम्ही प्रीति केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकहि आपणावर प्रीति करणाऱ्‍यांवर प्रीति करितात. . . . तुम्ही तर आपल्या वैऱ्‍यावर प्रीति करा, . . . म्हणजे . . . तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्‍यांच्यावरहि उपकार करणारा आहे.”—लूक ६:३२-३६; १०:२५-३७.

आपण क्षमा का केली पाहिजे?

आपण जेव्हा चुका करतो तेव्हा देवाने आपल्याला क्षमा करावी, अशी आपण अपेक्षा करतो. आपल्याला क्षमा करावी, अशी देवाला प्रार्थना करणे योग्य आहे, असे येशूने शिकवले. (मत्तय ६:१२) पण, आपण जर इतरांना क्षमा केली तरच देव आपल्याला देखील क्षमा करेल, असेही येशूने म्हटले. त्याने म्हटले: “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाहि क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताहि तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही.”—मत्तय ६:१४, १५.

कुटुंबात सुखशांती कशी नांदू शकते?

येशूने लग्न केले नव्हते तरीपण कुटुंबात सुखशांती कशी नांदू शकते याबाबतीत त्याच्याकडून आपण बरेच काही शिकू शकतो. आपले बोलणे व कार्य या दोन्ही गोष्टींद्वारे त्याने आपल्याकरता एक कित्ता घालून दिला आहे जो आपण गिरवला पाहिजे. पुढील तीन गोष्टींवर विचार करा:

१. पतीने आपल्या पत्नीवर स्वतःच्या शरीरासारखे प्रेम करावे. येशूने पतींसाठी एक आदर्श मांडला. त्याने आपल्या शिष्यांना म्हटले: “मी तुम्हांस नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी.” कशी? “जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशी.” (योहान १३:३४) हे तत्त्व पतींना लागू करून बायबल असे म्हणते: “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले, . . . त्याचप्रमाणे पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वत:वरच प्रीति करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करितो, जसे ख्रिस्तहि मंडळीचे पालनपोषण करितो तसे तो करितो.”—इफिसकर ५:२५, २८, २९.

२. पतीपत्नीने एकमेकांशी विश्‍वासू असले पाहिजे. विवाहाच्या चाकोरीबाहेरचे अनैतिक संबंध यहोवाविरूद्ध पाप आहे; यांमुळे कुटुंबे उद्ध्‌वस्त होतात. येशूने म्हटले: “तुम्ही वाचले नाही काय की, . . . ह्‍याकरिता पुरूष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील? ह्‍यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. . . . मी तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करितो तो व्यभिचार करितो; [आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करितो तोहि व्यभिचार करितो].”—मत्तय १९:४-९.

३. मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत असले पाहिजे. येशू परिपूर्ण होता आणि त्याचे आईवडील अपरिपूर्ण होते. तरीपण तो त्यांच्या आज्ञेत राहिला. १२ वर्षांच्या येशूविषयी बायबल काय म्हणते ते पाहा: “तो त्यांच्याबरोबर [आईवडिलांबरोबर] खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला.”—लूक २:५१; इफिसकर ६:१-३.

या सिद्धांतांचे आपण पालन का केले पाहिजे?

आपल्या शिष्यांना शिकवलेल्या धड्यांविषयी येशू म्हणाला: “जर ह्‍या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहा.” (योहान १३:१७) आपल्याला जर खरे ख्रिस्ती व्हायचे आहे तर येशूने इतरांना वागवण्याविषयी जो सल्ला दिला, त्याचे पालन आपण केले पाहिजे. त्याने असे म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” —योहान १३:३५. (w०८ ८/१)

अधिक माहितीकरता, बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकातला १४ वा अध्याय पाहाa

[तळटीप]

a यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

[२४ पानांवरील चित्र]

येशूने दिलेल्या उधळ्या पुत्राच्या दाखल्यावरून आपण दयाळुपणा व क्षमाशील वृत्ती दाखवण्याचे महत्त्व शिकतो.—लूक १५:११-३२

[२५ पानांवरील चित्र]

पतीपत्नीने एकमेकांसोबत विश्‍वासू असले पाहिजे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा