“एकतेचा आदर्श”
ब्राझीलच्या साउ पाउलु येथील इंडायाटुबा या ठिकाणाच्या एका वृत्तपत्रातील अग्रलेखाचे हे शीर्षक होते. पण हा आदर्श कोणी मांडला होता? लेखकाने असे लिहिले, “एक नवीन ‘राज्य सभागृह’ (अर्थात यहोवाच्या साक्षीदारांचे मंदिर किंवा प्रेक्षागृह) बांधण्याची योजना करणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांनी सहकार्याचा प्रत्यक्षात आदर्श मांडला आहे.”
अशा प्रसंगांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांमधील एकता दिसून येते. त्या लेखात पुढे असे म्हटले होते: “स्वतःसाठी उपासना-स्थळ बांधण्यासाठी स्त्री-पुरुष, अबाल-वृद्ध असे सगळेजण एकत्र मिळून स्वेच्छेने काम करत असल्याचे दृश्य खरोखर प्रेरणादायक होते.”
यहोवाचे साक्षीदार इतरही बाबतीत उदाहरणीय आहेत. त्या स्तंभलेखात असेही म्हटले होते की, “यहोवाचे साक्षीदार लोकांसोबत फक्त बायबलचा अभ्यास आणि प्रार्थनाच करत नाहीत, तर मद्य आणि अंमली पदार्थांचे व्यसन असलेल्या लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी मदत करतात व लोकांना प्रेमाने आणि एकतेने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात.” पण हे ते कसे साध्य करतात? बायबलमधील सल्ल्यानुसार जीवन जगण्याद्वारे वाईट सवयी सुटू शकतात हे साक्षीदारांना ठाऊक आहे. म्हणूनच, स्वतः शिकत असलेल्या गोष्टी इतरांना शिकवण्याचा ते प्रयत्न करतात. त्या लेखात शेवटी असे म्हटले होते की, त्यांनी “सर्वांपुढे हा आदर्श मांडला आहे.”
यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांकरता कोणीही येऊ शकते; शिवाय त्यांच्या सभांमध्ये देणगी गोळा केली जात नाही. तुमच्या परिसरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या एखाद्या राज्य सभागृहात जाऊन तुम्ही याची खातरी करू शकता.