वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 १०/१५ पृ. ३०-३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • जीवन व रक्‍त—यांना तुम्ही पवित्र मानता का?
    उपासनेतील ऐक्य
  • जीवनाच्या देणगीची उचित कदर बाळगा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • रक्‍ताने जीवन वाचविणे—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • रक्‍त–जीवनासाठी अत्यावश्‍यक
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 १०/१५ पृ. ३०-३१

वाचकांचे प्रश्‍न

रक्‍ताच्या उचित वापराविषयी बायबलमध्ये दिलेल्या आज्ञा लक्षात घेता स्वतःच्याच रक्‍ताचा वापर होत असलेल्या वैद्यकीय उपचारांबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचा काय दृष्टिकोन आहे?

या संदर्भात, आपल्याला काय पसंत आहे किंवा डॉक्टर काय सांगतात याच्या आधारे निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक ख्रिश्‍चनाने बायबल काय म्हणते याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. कारण हा प्रश्‍न यहोवा आणि त्या व्यक्‍तीमधला आहे.

आपल्याला जीवन देणाऱ्‍या यहोवाने आज्ञा दिली आहे की, रक्‍ताचे सेवन करू नये. (उत्पत्ति ९:३, ४) प्राचीन इस्राएलला दिलेल्या नियमशास्त्रात देवाने रक्‍ताचा उपयोग करण्यावर प्रतिबंध घातला कारण रक्‍त हे जीवनाचे सूचक आहे. त्याने अशी आज्ञा दिली होती: “शरीराचे जीवन तर रक्‍तात असते, आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्‍चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे.” पण समजा कोणी मांस खाण्यासाठी एखादा पशू मारला तर काय? देव म्हणाला: “त्याने त्याचे रक्‍त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.”a (लेवीय १७:११, १३) यहोवाने ही आज्ञा वारंवार सांगितली. (अनुवाद १२:१६, २४; १५:२३) सोन्सिनो कुमेश हे यहुदी पुस्तक म्हणते: “रक्‍त साठवले जाऊ नये तर ते जमिनीवर ओतून वापरासाठी अयोग्य ठरवले जावे.” कोणत्याही इस्राएली व्यक्‍तीला दुसऱ्‍या प्राण्याचे रक्‍त काढून ठेवण्याची, साठवण्याची आणि वापरण्याची अनुमती नव्हती; कारण त्यावर केवळ देवाचाच हक्क होता.

मशीहा मेल्यावर मोशेचे नियमशास्त्र पाळण्याचे बंधन कोणावरही राहिले नाही. मात्र रक्‍ताच्या पावित्र्याविषयी देवाचा तोच दृष्टिकोन राहिला. देवाच्या पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन प्रेषितांनी ख्रिश्‍चनांना ‘रक्‍त वर्ज्य करावे’ अशी सूचना दिली. ती आज्ञा क्षुल्लक नव्हती. लैंगिक अनैतिकता किंवा मूर्तिपूजेपासून दूर राहण्याइतकीच ती आज्ञा देखील नैतिकदृष्ट्या महत्त्वाची होती. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; २१:२५) २० व्या शतकात, रक्‍तदान आणि रक्‍त संक्रमणाची प्रथा रूढ होऊ लागली तेव्हा ती देवाच्या वचनाच्या विरोधात आहे हे यहोवाच्या साक्षीदारांना कळाले.b

काही वेळा, डॉक्टर म्हणतात, शस्त्रक्रियेच्या काही आठवड्यांआधी रुग्णाचेच रक्‍त जमा करून (प्रीऑपरेटिव्ह ऑटोलोगस ब्लड डोनेशन किंवा पॅड) शस्त्रक्रियेच्या वेळी गरज भासलीच तर तेच जमा केलेले रक्‍त त्याला दिले जाईल. परंतु, रक्‍त जमा करणे, साठवणे आणि संक्रमित करणे तर लेवीय आणि अनुवाद या पुस्तकांमध्ये सांगितलेल्या नियमाच्या स्पष्टपणे विरोधात आहे. रक्‍त साठवायचे नाही, तर ते ओतायचे आहे, जणू देवाला परत करायचे आहे. मोशेचे नियमशास्त्र आज आपल्याला लागू होत नाही हे खरे आहे. तरीपण, त्यामध्ये दिलेल्या तत्त्वांचा यहोवाचे साक्षीदार आदर करतात आणि ‘रक्‍त वर्ज्य’ करण्याचा त्यांचा निर्धार पक्का आहे. म्हणूनच, आपण रक्‍तदान करत नाही किंवा ‘जमिनीवर ओतण्यासाठी असलेले’ स्वतःचेच रक्‍त संक्रमणासाठी साठवूनही ठेवत नाही. कारण हे देवाच्या नियमाच्या विरोधात आहे.

परंतु, रक्‍ताचा उपयोग केल्या जाणाऱ्‍या अशा काही पद्धती किंवा चाचण्या आहेत ज्या देवाच्या तत्त्वाच्या थेट विरोधात नाहीत. उदाहरणार्थ, काही ख्रिश्‍चनांनी काही चाचण्यांसाठी किंवा परीक्षणासाठी आपले रक्‍त दिले आहे; हे रक्‍त नंतर फेकले जाते. रक्‍ताचा समावेश असलेल्या इतरही काही जटिल पद्धती आहेत ज्यांची डॉक्टर शिफारस करू शकतात.

जसे की, काही शस्त्रक्रियांमध्ये, हेमोडायल्युशन नावाच्या एका पद्धतीत काही रक्‍त शरीरापासून दुसरीकडे वळवले जाते. मग रुग्णाच्या शरीरातले बाकीचे रक्‍त पातळ केले जाते. त्यानंतर, दुसरीकडे वळवलेले रक्‍त पुन्हा त्याच्या शरीरात पाठवले जाते. अशाप्रकारे, त्याच्या रक्‍ताचे प्रमाण नॉर्मलवर आणतात. अशाच आणखी एका पद्धतीत, जखमेतून निघणारे रक्‍त अडवून गाळले जाते ज्यामुळे त्यातल्या लाल पेशी रुग्णाला पुन्हा दिल्या जाऊ शकतात; या पद्धतीला सेल साल्व्हेज (पेशींचा बचाव) म्हणतात. आणखी एका पद्धतीत, रक्‍त एका यंत्रात वळवले जाते आणि जे काम सहसा शरीरातले वेगवेगळे अवयव (जसे की, हृदय, फुफ्फुस किंवा मूत्रपिंड) करतात ते काम या यंत्राकरवी केले जाते. मग यंत्रातले रक्‍त पुन्हा एकदा रुग्णाच्या शरीरात पाठवले जाते. इतर काही पद्धतींमध्ये, रक्‍तातले भाग वेगळे करणाऱ्‍या यंत्रात (सेंट्रीफ्युज) रक्‍त पाठवले जाते आणि अशाप्रकारे त्यातील हानीकारक किंवा सदोष भाग काढले जातात. किंवा मग, रक्‍तातला एखादा घटक वेगळा करून शरीराच्या दुसऱ्‍या एका ठिकाणी त्याचा वापर केला जातो. अशाही काही चाचण्या आहेत ज्यांमध्ये थोडेसे रक्‍त घेतले जाते आणि मग टॅग लावण्यासाठी (ओळखता यावे म्हणून लेबल लावण्यासाठी) वापरले जाते किंवा औषधात मिसळून ते पुन्हा रुग्णाला देण्यात येते.

ही प्रत्येक पद्धत वेगवेगळ्या प्रकारची असेल. शिवाय नवनवीन पद्धती, उपचार किंवा चाचण्या निर्माण होतच राहतील. परंतु, प्रत्येक पद्धतीचे परीक्षण करून निर्णय घेणे ही आमची जबाबदारी नाही. शस्त्रक्रियेच्या वेळी, वैद्यकीय चाचणीत किंवा सध्या चालू असलेल्या उपचारात आपल्या रक्‍ताचा कसा वापर केला जातो हे प्रत्येक ख्रिश्‍चनाने स्वतःसाठी ठरवावे. त्याच्या रक्‍ताचे नेमके काय केले जाईल याविषयी त्याने आधीच डॉक्टरांकडून किंवा टेक्नीशियनकडून सविस्तर माहिती मिळवावी. त्यानंतर, त्याच्या विवेकानुसार त्याने निर्णय घ्यावा. (पेटी पाहा.)

देवावर “संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्‍तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीति” करीन असे समर्पण करतेवेळी आपण म्हटले होते आणि ते आपले कर्तव्य आहे हे प्रत्येक ख्रिश्‍चनाने मनात बाळगावे. (लूक १०:२७) यहोवाचे साक्षीदार जगातील बहुतेक लोकांपेक्षा वेगळे आहेत; देवासोबतच्या चांगल्या नातेसंबंधाला ते खूप महत्त्व देतात. परंतु, सर्वांनीच येशूने सांडलेल्या रक्‍तावर विश्‍वास ठेवावा असे उत्तेजन आपल्याला आपला जीवनदाता देतो. त्याविषयी असे म्हटले आहे: “त्या प्रियकराच्या [येशू ख्रिस्त] ठायी त्याच्या रक्‍ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्‍ति म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.”—इफिसकर १:७.

[तळटीपा]

a प्राध्यापक फ्रँक एच. गोरमन लिहितात: “रक्‍त ओतण्याची क्रिया पूज्यभावाने केले जाणारे एक कृत्य आहे. त्यावरून त्या प्राण्याच्या जीवनाविषयी आदर व्यक्‍त केला जातो. आणि प्राण्याच्या जीवनाविषयी आदर दाखवणे म्हणजे देवाविषयी आदर दाखवणे ज्याने सर्व जीवसृष्टी निर्माण केली आणि जो त्याची काळजी घेतो.”

b जुलै १, १९५१ च्या टेहळणी बुरूज पत्रिकेत या संदर्भातील मुख्य प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आली आहेत आणि दान केलेल्या रक्‍ताचे संक्रमण अनुचित का आहे हे दाखवण्यात आले आहे.

[३१ पानांवरील चौकट/चित्रे]

स्वतःला विचारण्याचे प्रश्‍न

माझे रक्‍त शरीराच्या बाहेर दुसरीकडे वळवून काही वेळासाठी रक्‍ताचा प्रवाह अडवला जात असला तर मग ते रक्‍त माझ्या शरीराचा भाग आहे आणि म्हणून ते ‘जमिनीवर ओतण्याची’ गरज नाही असे मानण्यास माझा विवेक मला अनुमती देईल का?

शारीरिक तपासणीच्या वेळी किंवा एखाद्या उपचारपद्धतीत माझे रक्‍त काढून, त्यात बदल करून पुन्हा शरीरात (किंवा शरीरावर) पाठवले जात असल्यास माझा बायबल प्रशिक्षित विवेक मला बोचेल का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा