तुम्ही समजदार आहात का?
इस्राएलमध्ये न्यायाधीश नेमताना मोशेने “बुद्धिमान, समजदार व अनुभविक पुरुष” निवडले. (अनुवाद १:१३) अनुभव तर वयानुसार येतो. परंतु फक्त अनुभव असणेच पुरेसे नव्हते. तर बुद्धी आणि समजूतदारपणा देखील हवा होता.
जो समजदार असतो तो विचारपूर्वक बोलतो व वागतो. वेबस्टर्स नाईन्थ न्यू कॉलिजिएट डिक्शनरी या इंग्रजी शब्दकोशात म्हटले आहे, की “समजदार व्यक्तीला केव्हा मौन पाळायचे हे माहीत असते.” उपदेशक ३:७ मध्ये म्हटले आहे, की “बोलण्याचा समय असतो” आणि “मौन धरण्याचा समय असतो.” समजदार व्यक्तीला या दोन गोष्टींमधला फरक समजतो. बऱ्याचदा, मौन पाळणेच चांगले असते कारण बायबल म्हणते: “फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा.”—नीतिसूत्रे १०:१९.
खऱ्या ख्रिश्चनांनी एकमेकांबरोबर व्यवहार करताना समजूतदारपणा दाखवावा. जी व्यक्ती सर्वात जास्त बोलते किंवा सर्वात प्रभावीपणे बोलते तीच सर्वात विशेष किंवा महत्त्वाची व्यक्ती आहे असे नाही. मोशेची आठवण करा. तो “भाषणात . . . पराक्रमी होता,” तरीपण जोपर्यंत त्याने धीर, नम्रता व आत्मसंयम हे गुण अंगी आणले नाहीत तोपर्यंत तो इस्राएल राष्ट्राचे प्रभावीपणे नेतृत्व करू शकला नाही. (प्रेषितांची कृत्ये ७:२२) यास्तव, इतरांवर अधिकार असलेल्यांनी, नम्रतेने वागण्याचा व इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजण्याचा सदैव प्रयत्न केला पाहिजे.—नीतिसूत्रे ११:२.
येशू ख्रिस्ताने आपल्या “सर्वस्वावर” ज्यांना नेमले आहे त्यांना बायबलमध्ये “विश्वासू व बुद्धिमान [समजदार]” दास म्हटले आहे. (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २४:४५-४७) हे समजदार दास कोणत्याही गोष्टीचा आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावत नाहीत; त्याअर्थी, ते कधीही आपल्या मर्यादा विसरून यहोवाच्या पुढे जात नाहीत. तसेच, एखाद्या विषयाबाबत यहोवा स्पष्टीकरण देतो तेव्हा ते त्याच्या मार्गदर्शनानुसार वागण्यात मागेही पडत नाहीत. कारण, कधी बोलावे व अधिक स्पष्टीकरण मिळण्याकरता कधी शांत राहावे हे त्यांना माहीत आहे. सर्व ख्रिस्ती जनांना त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करण्याचे व त्यांच्याप्रमाणे स्वतःला समजदार शाबीत करण्याचे प्रोत्साहन दिले जाते.—इब्री लोकांस १३:७.