क्षमाशील का असावे?
“क्षमाशील वृत्ती असलेल्या लोकांना मानसिक शांती लाभते तसेच त्यांची तब्येतही चांगली राहते, असा वैज्ञानिकांनी शोध लावला आहे,” असे कॅनडाच्या द टोरोन्टो स्टारने म्हटले. पण, “क्षमा करणे म्हणजे नेमके काय आणि त्याचे परिणाम काय याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही,” असे अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक कार्ल थॉरसन यांनी म्हटले. ते स्टॅनफोर्ड फर्गिव्हनेस प्रोजेक्टचे प्रमुख संशोधक आहेत.
क्षमाशीलता हा ख्रिस्ती धर्माचा महत्त्वपूर्ण गुण समजला जातो. द टोरोन्टो स्टार बातमीपत्राने क्षमाशीलतेची अशाप्रकारे व्याख्या केली: “तुमचे चुकले आहे हे जाणणे, राग सोडून देऊन ज्याने तुमचे मन दुखवले आहे त्याच्याशी पुन्हा दयाळूपणे व प्रेमाने वागणे.” क्षमाशीलतेचा अर्थ, एखाद्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करणे, त्यावर विचार न करणे, तो अपराध नाकबूल करणे असा होत नाही. किंवा मग, क्षमाशीलतेचा अर्थ तुम्ही दुर्व्यवहार किंवा अपमान सहन करीत राहावा, असाही होत नाही. बातमीपत्राने म्हटले, की खरी क्षमाशीलता म्हणजे “राग आणि नकारात्मक भावना यांना मनात थारा न देणे किंवा त्यांना मनातून पार काढून टाकणे.”
क्षमाशीलतेमुळे आणखी कोणते शारीरिक फायदे मिळू शकतात यावर आणखीन अभ्यास करणे जरूरीचे आहे. सध्या मानसिक आरोग्याच्या फायद्यांबद्दल त्यांनी माहिती दिली. ते म्हणतात, की त्यामुळे “तणाव, चिंता आणि निराशा कमी होते.”
क्षमाशीलतेचे एक सर्वोत्कृष्ट कारण इफिसकर ४:३२ मध्ये दिले आहे: “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.” (तिरपे वळण आमचे.) इतर गुणांबरोबर क्षमाशीलतेच्या बाबतीतही आपल्याला देवाचे अनुकरण करण्यास आर्जवण्यात आले आहे.—इफिसकर ५:१.
आपण इतरांना क्षमा न केल्यास यहोवा देवासोबतचे आपले नातेसंबंध बिघडू शकतात. कारण आपण एकमेकांच्या अपराधांची क्षमा करावी अशी यहोवा देव आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि ही अपेक्षा पूर्ण केल्यावरच आपण आपल्या चुकांबद्दल यहोवाकडे क्षमेची याचना करू शकतो.—मत्तय ६:१४; मार्क ११:२५; १ योहान ४:११.