वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ६/१ पृ. ३२
  • यहोवाला निष्ठावान राहणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाला निष्ठावान राहणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ६/१ पृ. ३२

यहोवाला निष्ठावान राहणे

लोकांमध्ये निष्ठा हा गुण आज क्वचितच दिसतो. तरीही खऱ्‍या देवाच्या सेवकांची ओळख या गुणावरून पटते. निष्ठावान व्यक्‍ती कितीही दुःख आले तरीही खंबीर आणि दृढ राहते. सदाचारी राजा हिज्कीयाचेच उदाहरण घ्या. बायबल म्हणते “त्याच्यामागून यहूदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्यापूर्वीहि झाला नाही.” हिज्कीयाच्या बाबतीत अशी कोणती वेगळी गोष्ट पाहायला मिळते? त्या काळातील अधिकांश लोक मोलेक या खोट्या दैवताची उपासना करायचे, पण हिज्कीया मात्र “परमेश्‍वराला [यहोवाला] धरून राहिला.” होय, हिज्कीयाने “[यहोवाला] अनुसरण्याचे सोडिले नाही; परमेश्‍वराने . . . ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळिल्या.”—२ राजा १८:१-६.

यहोवाला निष्ठावान राहिलेल्यांपैकी आणखी एक व्यक्‍ती म्हणजे प्रेषित पौल. त्याने संपूर्ण जीवन यहोवाची सेवा केली. त्याच्या एकनिष्ठ सेवेचा बोलका अहवाल बायबलमध्ये ग्रीक शास्त्रवचनांत आपल्याला वाचायला मिळतो. त्यामुळेच मृत्यूआधी त्याला असे म्हणता आले: “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे.”—२ तीमथ्य ४:७.

खरोखर, हिज्कीया आणि पौल यांचे निष्ठेचे उदाहरण अनुकरण करण्याजोगे आहे. आपण देखील त्यांच्याचप्रमाणे परमेश्‍वर यहोवाला निष्ठावान व विश्‍वासू राहू या!—इब्री लोकांस १३:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा