वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १२/१ पृ. ३२
  • मुलांचं संगोपन म्हणजे तारेवरची कसरत!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मुलांचं संगोपन म्हणजे तारेवरची कसरत!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १२/१ पृ. ३२

मुलांचं संगोपन म्हणजे तारेवरची कसरत!

आज मुलांना आणि विशेषतः कोवळ्या वयाच्या मुलांना लहानाचं मोठं करणं पालकांकरता किती कठीण झालं आहे हे आपल्याला माहीतच आहे. कॅनडा, मॉनट्रीयल येथील द गॅझेट या मासिकात असं नमूद करण्यात आलं होतं, की “वाढत्या वयाच्या मुलांकरता” दारू पिणं, मादक पदार्थ सेवन करणं यांसारखे प्रकार अगदी “सर्वसामान्य” झाले आहेत. पालकांनी, “आपल्या मुलांमध्ये होणारे बदल ओळखण्याकरता नेहमी दक्ष असलं पाहिजे,” या गोष्टीवर ते मासिक जोर देते.

वाढत्या वयातील आपल्या मुलांना अशा समस्या आहेत किंवा नाहीत हे ओळखण्याकरता पालकांनी मुलांच्या कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे? अमेरिकन अकॅडमी ऑफ चाईल्ड ॲण्ड ॲडोलेसेंट सायकॅट्री या संस्थेने काही शारीरिक, मानसिक आणि सामाजिक लक्षणांविषयी सांगितलं आहे; मुलांना फार थकल्यासारखं वाटणं, त्यांच्या वागण्यात, बोलण्या-चालण्यात बदल होणं, तास न्‌ तास बंद खोलीत स्वतःला कोंडून घेणं, लहानसहान गोष्टींवर वाद घालणं आणि बेकायदेशीर कामांत गोवल्यामुळे पकडलं जाणं, ही ती लक्षणं होत.

तर मग, अशा हानीकारक गोष्टींपासून आणि त्यामुळे संभवणाऱ्‍या दुष्परिणामांपासून आपल्या मुलांना वाचवण्याकरता पालक काय करू शकतात? मॅक्‌गील विद्यापीठाचे डॉ. जेफ्री एल. यांना असे वाटते, की पालकांमध्ये आणि वाढत्या मुलांमध्ये खुले दळणवळण असल्यास आणि ती दोघे एकमेकांचा आदर करत असल्यास मुलांना त्यांच्या पुढील जीवनात इतक्या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. द गॅझेट मासिकात असंही सांगण्यात आलं होतं, की वाढत्या वयाच्या मुलांना मुक्‍त जीवन जगण्यास आवडत असले तरी, त्यांना “त्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनाची, त्यांच्या आधाराची, त्यांच्या मदतीची आणि त्यांच्या प्रेमाची” गरज ही असतेच. यावरून आपल्याला बायबलमधील शब्दांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (नीतिसूत्रे २२:६) देवाचा पालकांना हाच सल्ला आहे, की त्यांनी उदाहरणीय असावं, आपल्या मुलांसोबत बोलावं आणि त्यांना प्रेमानं शिकवावं.—अनुवाद ६:६, ७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा