वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ११/१५ पृ. ३२
  • “राज्य सभागृहाला माझी पहिली भेट”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “राज्य सभागृहाला माझी पहिली भेट”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ११/१५ पृ. ३२

“राज्य सभागृहाला माझी पहिली भेट”

लॉराa नावाच्या एका कॉलेजच्या विद्यार्थीनीला, कोणत्याही धार्मिक सभेस उपस्थित राहून तिथे काय पाहायला मिळाले त्यावर एक अहवाल लिहिण्यास सांगितला होता. लॉराने यहोवाच्या साक्षीदारांच्या धार्मिक सभेला उपस्थित राहण्याचे ठरवले. तिच्या निबंधाचे शीर्षक होते, “राज्य सभागृहाला माझी पहिली भेट.” साक्षीदारांविषयी कोणता वेगळेपणा लॉराला पाहायला मिळाला? तिने आपल्या निबंधात नोंदवलेल्या अनेक गोष्टींपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत:

मुले: “सगळी लहान मुलं वेगळी न बसता मोठ्यांसोबतच बसली होती. मी आजवर पाहिलेल्या सगळ्या चर्चमध्ये, आईवडील चर्चमध्ये बसलेले असतात तर मुले सन्डे स्कूलमध्ये.”

वांशिक एकता: “सहसा विशिष्ट वंशाचे किंवा जातीचे लोक एकाच चर्चमध्ये जातात. . . . यहोवाच्या साक्षीदारांमध्ये मात्र असा भेदभाव, गटबाजी दिसली नाही; ते सर्व एकत्र बसलेले होते.”

अगत्यपूर्ण वागणूक: “बरेचजण स्वतःहून माझ्याशी बोलले. . . . मी कुणासोबत बायबल अभ्यास करत आहे का असंही काहींनी विचारलं. पण, बायबल अभ्यास करण्याची जबरदस्ती ते करत होते असं मला मुळीच वाटलं नाही. तो निर्णय त्यांनी माझ्यावर सोडला.”

दान मागितले जात नाही: “विशेष म्हणजे, तिथं कुणीही दान मागायला येत नाही. . . . आजपर्यंत ज्या ज्या चर्चमध्ये मी गेले आहे तिथं चक्क लहान मुलांकडूनही दान मागितले जाते.”

जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या जवळजवळ ९०,००० मंडळ्या आहेत. तेव्हा, तुमच्यासाठी सगळ्यात जवळ असलेल्या एखाद्या मंडळीला भेट द्यायला काय हरकत आहे?

[तळटीप]

a  नाव बदलले आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा