वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १०/१५ पृ. ३२
  • “विश्‍वासाने प्रेरित असलेली दृढता”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “विश्‍वासाने प्रेरित असलेली दृढता”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १०/१५ पृ. ३२

“विश्‍वासाने प्रेरित असलेली दृढता”

सन १९९८ मध्ये, गी कॅनोनिसी यांचे फ्रेंच भाषेत एक नवीन पुस्तक प्रकाशित झाले; या पुस्तकाचे ले टेमवेन द जेओवा फॅस आ इटलर (हिटलरपुढे यहोवाचे साक्षीदार) हे शीर्षक होते; या पुस्तकाची खूप प्रशंसा करण्यात आली होती. आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत, आदरणीय फ्रेंच इतिहासकार फ्रॉन्सवा बेडारिडा यांनी असे लिहिले: “हे पुस्तक सर्वांना आवडले. कारण त्याने फक्‍त एक रिकामी जागा भरून काढली नाही तर त्याचे प्रकाशनही एकदम योग्य वेळी झाले. . . . नात्सी हुकुमशाहीत यहोवाच्या साक्षीदारांना काय भोगावे लागले हे तज्ज्ञांच्या व्यतिरिक्‍त आणखी कोणाला माहीत आहे? बारा वर्षांच्या या राजवटीत त्यांचा किती क्रूर व हिंसकरीत्या छळ झाला. त्यांना देखील छळछावण्यांतील भयानकता अनुभवावी लागली. त्यांचा विश्‍वास आणि मत यामुळे त्यांना बरीच मोठी किंमत मोजावी लागली. मग इतिहास या ख्रिश्‍चनांना विसरून का गेला बरे?. . . .

“एका लहानशा, विखुरलेल्या व निरुपद्रवी धार्मिक गटाचा इतका निष्ठुर व पद्धतशीर छळ का करण्यात आला? हाच एक प्रश्‍न अद्याप सोडवलेला नाही. जर्मनीमध्ये साक्षीदारांची संख्या लोकसंख्येच्या मानाने फार कमी होती; आकडेवारीनुसार, ६ कोटींपेक्षा अधिक लोकसंख्येमध्ये फक्‍त २०,००० यहोवाचे साक्षीदार होते; शिवाय, ते सर्व शांतिप्रिय नागरिक होते. ते नियमांचे पालन करणारे होते व त्यांच्यापासून कोणालाही धोका नव्हता. काम करणे व आपल्या मुलांचे नीट पालनपोषण करणे एवढीच त्यांची इच्छा होती. . . .

“येशू ख्रिस्तावरील विश्‍वासाच्या आंतरिक शक्‍तीने बाह्‍य दबावांचा प्रतिकार करण्याची कुवत असलेल्या आध्यात्मिकरित्या निग्रही आणि विजयी ठरलेल्या विश्‍वासूंचा छळ करण्यात आला; राज्य पोलिसांकडून त्यांची शारीरिक छळवणूक करण्यात आली, एवढेच नव्हे तर त्यांनी वीरगती आणि हौतात्मही प्राप्त केले.”

धार्मिक असहिष्णुता असूनही आपल्या ख्रिस्ती विश्‍वासासाठी हौतात्म्य स्वीकारलेल्या यहोवाच्या साक्षीदारांची कथा विलक्षण आहे. या पुस्तकाच्या परीक्षणात एका प्रमुख फ्रेंच कॅथलिक बातमीपत्रकाने, ला क्र्‌वाने ठामपणे म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांबद्दल जी थोडीफार माहिती होती त्यातून गी कॅनोनिसी यांनी इतके पुरावे आणले की साध्यासोप्या शब्दांत व्यक्‍त केलेल्या विश्‍वासाने, अगदी लहान मुलांनीही शेवटपर्यंत दाखवलेल्या अटळ विश्‍वासाने प्रेरित होऊन या साक्षीदारांनी केवढी दृढता दाखवली ते पाहून कोणीही निरुत्तर होईल. यहोवाच्या साक्षीदारांच्या या स्मरणावरून ते कशाप्रकारचे ख्रिस्ती आहेत त्याविषयी सध्या चाललेल्या वादविवादाचे कारण कळेल.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा