वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ८/१ पृ. ३२
  • वंशवाद आणिधर्म

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वंशवाद आणिधर्म
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ८/१ पृ. ३२

वंशवाद आणिधर्म

अमेरिकेत मी १९७८ साली आलो तेव्हा मला वाटलं होतं, की अमेरिकेनं आपल्यातील वांशिक समस्या केव्हाच सोडवल्या असतील, कृष्णवर्णीयांना समान नागरीक म्हणून लेखले जात असेल,” असे दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले लेखक मार्क माथबेन यांनी टाईम मासिकाला मुलाखत देताना म्हटले. “पुष्कळ बाबतींत मला हे खरं असल्याचं दिसून आलं. असं वाटत होतं, की अमेरिका दक्षिण आफ्रिकापासून शंभर वर्ष पुढं आहे. पण नंतर मात्र मला दिसून आलं, की लोकांची मनं अजून काही बदलली नाहीत, आणि हे पाहून मला धक्काच बसला.” धक्का बसण्यासारखे असे काय त्यांच्या पाहण्यात आले होते?

माथबेन म्हणतात: “अमेरिकेत काळ्या-गोऱ्‍यांचे विलगीकरण सर्वात जास्त आढळतं, ते रविवारी सकाळी ११ वाजता.” त्यांच्या पाहण्यात आले, की दुसऱ्‍या वंशाच्या लोकांसोबत मिळून चर्चमध्ये उपासना करण्यासही लोक तयार नाहीत. तर “मग इतर दिवशी त्यांच्या कशा भावना असतील?” असे त्यांनी विचारले. या परिस्थितीत बदल करायचा असेल तर तो शिक्षणाच्या माध्यमाने होऊ शकतो असे सुचवताना माथबेन म्हणाले: “शिक्षण तुम्हाला मानवजातीची समानता स्वीकारायला भाग पाडतं.”

शिक्षण हा उपाय आहे, असे यहोवाचे साक्षीदारही कबूल करतात पण, ते खासकरून देवाच्या वचनावर आधारित असलेल्या शिक्षणाची शिफारस करतात. होय, बायबल त्यांना वांशिक पूर्वग्रहाचे अडथळे काढून टाकण्यास मदत करते; आणि तेही अशा राष्ट्रांत जेथे वांशिक द्वेष बहुत प्रमाणात आहे. त्यांच्या राज्य सभागृहांत दर आठवडी विविध वंशाचे आणि राष्ट्रांचे लोक देवाचे वचन बायबल यांतील नियमांचे व तत्त्वांचे शिक्षण घेण्यासाठी एकत्र जमतात. या सभांमध्ये वर्गणी गोळा केली जात नाही. तुमचेही स्वागत आहे!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा