वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ७/१५ पृ. ३२
  • चांगले मित्र निवडण्याकरता मार्गदर्शन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगले मित्र निवडण्याकरता मार्गदर्शन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ७/१५ पृ. ३२

चांगले मित्र निवडण्याकरता मार्गदर्शन

मुलांना कपडे आणि संगीताच्या बाबतीत सल्ला हवा असतो तेव्हा ते त्यांच्या आईवडिलांकडे जाण्याऐवजी त्यांच्या मित्रांकडे जातात, असे रिडर्स डायजेस्ट पुस्तकाने म्हटले. त्यामुळे पालकांकरता हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे, की त्यांच्या मुलांचे मित्र कोण आहेत आणि कोठे आहेत.

“चौकशी करणं ही पालकांची जबाबदारी आहे,” असे दक्षिण आफ्रिकेच्या विद्यापीठामध्ये मानसशास्त्राच्या विभागात वरिष्ठ प्राध्यापिका म्हणून काम करत असलेल्या इझ्मी वॉन रेन्सबर्क यांनी म्हटले. त्यांनी पुढे असेही म्हटले: “त्यांच्याविषयी चौकशी केल्यामुळे मुलं चिडण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण नंतर ती शांतही होतील.” त्यांनतर या प्राध्यापिका पालकांकरता काही सूचना देतात. नियम पटण्याजोगे असण्यास हवेत आणि नियमांच्या मागे निश्‍चित अशी तत्त्वे देखील असली पाहिजेत; तुमच्या मुलाचे ऐका; त्यांच्याशी अवाजवीपणे वागू नका, तर शांत राहा आणि तुम्हाला काय म्हणायचे ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. तुमच्या मुलाची अनुचित सोबत्याशी मैत्री झाली असल्यास, मित्राला न भेटण्याची केवळ तंबी देण्याऐवजी मुलाच्या वागणुकीवर कोणता दुष्परिणाम झाला हे दाखवून द्या.

देवाचे वचन, बायबलमध्ये फार पूर्वीच पालकांकरता यासंदर्भात चांगला सल्ला देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, बायबल म्हणते: “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद” असा. (याकोब १:१९) कोणाशी संगती करावी याविषयी देखील शास्त्रवचनांमध्ये उत्तम सल्ला देण्यात आला आहे: “सुज्ञांची सोबत कर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) ही उदाहरणे दाखवून देतात, की कदर बाळगून बायबलचे वाचन करणाऱ्‍यांना आणि त्यात सांगितलेल्या गोष्टी दररोजच्या जीवनात लागू करणाऱ्‍यांना बुद्धी प्राप्त होते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा