“पुढील परिणामांचा विचार” करण्याकरता लागणारी बुद्धी
“तेविचारहीन राष्ट्र असे आहेत, त्यांच्यामध्ये समज म्हणून नाहीच. ते ज्ञानी असते, ते हे समजले असते, त्यांनी आपल्या पुढील परिणामाचा विचार केला असता तर किती बरे होते!”—अनुवाद ३२:२८, २९, पं.र.भा.
मोशेने असे, वचनयुक्त देशाच्या सीमेवर उभे असताना इस्राएलांना म्हटले. मोशे अशा काळाबद्दल त्यांना आगाऊ सांगत होता जेव्हा ते यहोवाला सोडून देतील व त्यांच्या कार्यांच्या परिणामांकडे जराही लक्ष देणार नाहीत. पुढील शतकांमध्ये, अनेक राजांसह इस्राएल लोकांनी देवाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.
उदाहरणार्थ, यहोवाव्यतिरिक्त इतर दैवतांची उपासना करणाऱ्या स्त्रियांबरोबर विवाह करायचा नाही ही ईश्वरी आज्ञा शलमोनाला माहीत होती. (अनुवाद ७:१-४) तरीसुद्धा त्याच्या अनेक ‘विदेशी स्त्रिया’ होत्या. परिणाम? बायबल अहवाल म्हणतो: “शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले; त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे.” (१ राजे ११:१, ४) शलमोन बुद्धिमान होता तरी, आपण देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यास काय ‘परिणाम होतील त्याचा विचार’ करण्याची त्याला चांगली समज नव्हती.
आपल्याबद्दल काय? जीवनातील निर्णयांचा आपण पुरेसा पूर्व विचार केल्यास आपण पुष्कळ दुःख टाळू शकतो. जसे की, ‘देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध’ करण्याचा सल्ला ख्रिश्चनांना देण्यात आला आहे. (२ करिंथकर ७:१) ही सुज्ञता आहे; पण पुष्कळांना, आपण पौलाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यास काय होईल ते आगाऊ पाहण्याची चांगली समज नाही. उदाहरणार्थ, अनेक तरुण तंबाखूचे प्राशन करून स्वतःचे शरीर दूषित करतात; अशाने आपण सुसंस्कृत व प्रौढ वाटू असे त्यांना वाटते. परंतु, नंतर अनेकांना हृदयाच्या तक्रारी, फुफ्फुसाचा कर्करोग किंवा फुफ्फुसातील वायुकोषात हवा भरल्यामुळे त्यांचा असामान्य फैलावाचा रोग होतो तेव्हा हे किती दुःखाचे असते!
आपल्या निर्णयांच्या व कार्यांच्या परिणामांचा गंभीरपणे विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. चांगल्या कारणास्तव पौलाने लिहिले: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.”—गलतीकर ६:७, ८.