वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१ पृ. ३२
  • वाईटावर विजय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाईटावर विजय
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१ पृ. ३२

वाईटावर विजय

“ह्‍या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीराजास शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्याचा हुकूम द्या, मी त्याचे डोके उडवितो.” अबीशय या इस्राएलच्या सेनापतीने अशी विनंती केली. शिमी नामक बन्यामिनाने द्वेषाने दावीद राजाविषयी अपशब्द काढले तेव्हा अबीशयाची अशी प्रतिक्रिया होती.—२ शमुवेल १६:५-९.

काट्याने काटा काढणे—या आज प्रचलित असलेल्या तत्त्वज्ञानाने तो प्रभावित झाला होता. होय, दावीदाचा अपमान केला म्हणून शिमीला अद्दल घडवावी असे अबीशयला वाटत होते.

पण दावीदाने कशी प्रतिक्रिया दाखवली? दावीदाने अबीशयला असे म्हणून रोखले: “त्याच्या वाटेस जाऊ नका.” शिमीने केलेल्या आरोपात तथ्य नसले तरी सूड उगवण्याच्या मोहापासून दावीदाने स्वतःला नम्रपणे रोखले. उलटपक्षी त्याने ही बाब यहोवाच्या हाती सोपवून दिली.—२ शमुवेल १६:१०-१३.

दावीद जेव्हा त्याच्या पुत्राने केलेल्या अयशस्वी बंडातून बचावतो आणि राजा होतो तेव्हा त्याला भेटायला येण्यात आणि दिलगिरी व्यक्‍त करण्यात शिमी पहिला होता. त्याला ठार मारावे असे अबीशयला परत वाटले, पण तसे करण्यापासून दावीदाने त्याला पुन्हा रोखले.—२ शमुवेल १९:१५-२३.

या प्रसंगी, दावीदाने येशू ख्रिस्तासारखी मनोवृत्ती दाखवली; प्रेषित पेत्राने येशू ख्रिस्ताविषयी म्हटले: “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; . . . तर यथार्थ न्याय करणाऱ्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.”—१ पेत्र २:२३.

“नम्र मनाचे व्हा; वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका,” असा बोध आज ख्रिश्‍चनांना दिला जातो. (१ पेत्र ३:८, ९) दावीदाने आणि येशू ख्रिस्ताने घालून दिलेल्या नमुन्याचे अनुसरण केल्याने आपल्यालाही ‘बऱ्‍याने वाईटाला जिंकता येईल.’—रोमकर १२:१७-२१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा