वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ३/१ पृ. ३२
  • देवाच्या नावाची पुनःस्थापना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या नावाची पुनःस्थापना
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ३/१ पृ. ३२

देवाच्या नावाची पुनःस्थापना

“अनेक वर्षांपासून किंवा कदाचित शतकांपासून बायबलमधून यहोवाचे नाव काढून टाकण्यात आले आहे, पण आधुनिक दिवसांतील यहोवाच्या साक्षीदारांच्याच धर्मात टेट्राग्रॅमटॉनकरता भूमिका घेतली आहे किंवा त्यांची पुनःस्थापना केली आहे.”a

हे शब्द जेओवा देन्त्रू ड्यू झूडाईसम्यू क्रिस्टॅनीसम्यू (यहुदी आणि ख्रिस्ती धर्मामध्ये यहोवा) पुस्तकातून घेण्यात आले आहेत. या पुस्तकाच्या लेखक ब्राझील देशवासीय असून त्याचे नाव आसीस ब्राझील असे आहे. पण प्रश्‍न हा येतो, की काही बायबल भाषांतरांमध्ये ईश्‍वरी नाव एका किंवा दुसऱ्‍या स्वरूपात उपयोगात आहे तर मग इतर भाषांतरांमधून देवाचे नाव का काढून टाकण्यात आले आहे? “देवाचे नाव अंधश्रद्धा . . . वाईट हेतूमुळे अथवा येशू आणि त्याची आई मरिया यांच्या नावांना जास्त उंचावण्याच्या हेतूने काढून टाकण्यात आले होते.”

पण लेखक ब्राझील अगदी बरोबर म्हणतात: “बायबलमधून काढून टाकण्यात आलेले [ईश्‍वरीय] नाव पोर्तुगाली भाषाच्या न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स यांमध्ये पुन्हा ज्या-त्या ठिकाणी टाकण्यात आले.” कसे? बायबलमध्ये यहोवाच्या नावाचा योग्य त्या ठिकाणी वापर करून असे करण्यात आले. यहोवा, हे नाव न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या बायबलमध्ये ७,२०० पेक्षा जास्त वेळा येते.

पोर्तुगाली भाषेतील आधुनिक शब्दशः भाषांतराचे पहिल्यांदा प्रकाशन झाल्यानंतर त्या भाषांतराच्या पासष्ट लाखांपेक्षा जास्त प्रतींचे वाटप करण्यात आले. ब्राझीलचे वृत्तपत्र, डिआरियू ड्यू नॉरडेस्टी (दक्षिणपूर्व दैनिक) याच्या संपादकाने असे विचारले की, “देवाला नाव आहे हे तुम्हाला माहीत होते का?” या आधुनिक बायबल भाषांतरामुळे लाखो लोक आता म्हणू शकतात, “होय, आम्हाला देवाचे नाव माहीत आहे. यहोवा हे ते ईश्‍वरी नाव आहे.”

[तळटीपा]

a हिब्रू भाषेत देवाचे नाव יהוה अशाप्रकारे लिहिण्यात आले आहे. या चार अक्षरी शब्दाला (ज्यांना उजवीकडून डावीकडे वाचले जाते) सहसा टेट्राग्रॅमटॉन असे म्हणतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा