वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 २/१ पृ. २४
  • दूर आणि छोटुकलं द्वीप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दूर आणि छोटुकलं द्वीप
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 २/१ पृ. २४

दूर आणि छोटुकलं द्वीप

सेंटहेलीना द्वीपाचे वर्णन करण्याकरता “दूर” आणि “छोटुकलं” या विशेषणांचा बहुतेकवेळा उपयोग केला जातो. हे अगदी उचित आहे कारण, सतरा किलोमीटर लांब आणि दहा किलोमीटर रुंद असलेला हा द्वीप, नजीकच्या आफ्रिकेच्या नैर्ऋत्य किनाऱ्‍यापासून केवळ १,९५० किलोमीटर दूर आहे. याच द्वीपावर नेपोलियन बोनापार्टला १८१५ मध्ये पराजित कैदी म्हणून त्याच्या शेवटल्या वर्षांत जीवन कंठण्यास पाठवण्यात आले होते.

समुद्रावरून हा द्वीप एका मजबूत किल्ल्याप्रमाणे वाटतो. हा द्वीप खरे तर एक मृत ज्वालामुखी आहे जो अटलांटिकपासून सरळ उंच आहे आणि त्यावर १,६०० ते २,३०० फूट उंचीचे सुळके उभे आहेत. द्वीपाच्या मध्यभागी २,६८५ फूट उंचीचा माऊन्ट ॲक्टीयन आहे जो सर्वांपेक्षा उंच आहे. दक्षिण अटलांटिकवरून सतत येणाऱ्‍या थंड व समुद्री वाऱ्‍यामुळे द्वीपावरचे हवामान सौम्य आणि सुखदायक आहे. पण समुद्रकिनाऱ्‍यापासून ते डोंगराळ भागात वेगवेगळे हवामान आणि झाडपाला दिसून येतो.

सेंट हेलीना १७ व्या शतकाच्या अंतापासून ब्रिटिशांच्या मालकीचा आहे. या द्वीपावर ५,००० लोकांची वस्ती आहे; यात, युरोपियन, आशियाई आणि आफ्रिकन उगमाचे लोक आहेत. येथे इंग्रजीच भाषा चालते पण बोलण्याची पद्धत जरा वेगळी आहे. येथे विमानतळ वगैरे काही नाही; बाहेरच्या लोकांशी संपर्क केवळ जहाजाद्वारेच येतो; दक्षिण आफ्रिका व इंग्लंडला सारखी ये-जा असते. खरे तर, एका सॅटेलाईट हुकपमुळे १९९० दशकाच्या मध्यात टेलिव्हिजनचे प्रसारण चालू झाले.

सन १९३० च्या दशकाच्या सुरवातीला देवाच्या राज्याची सुवार्ता येथे पहिल्यांदाच पोहंचली. (मत्तय २४:१४) तेव्हापासून अनेक द्वीपवासींनी, आध्यात्मिक संपत्ती साठवण्यास सुरवात केली आहे; या संपत्तीपुढे तर भौतिक संपत्ती अगदी क्षुल्लक आहे. (मत्तय ६:१९, २०) आज, सेंट हेलीनाच्या लोकसंख्येला पाहता, तेथील ३१ लोकांमागे १ जण साक्षीदार आहे; हे प्रमाण जगात अगदी भिन्‍न आणि सर्वोत्तम आहे!

[२४ पानांवरील नकाशा]

(For fully formatted text, see publication)

सेंट हेलीना

जेम्सटाऊन

लेवलवुड

आफ्रिका

अटलांटिक महासागर

सेंट हेलीना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा