आईच्या वात्सल्यापेक्षाही दाट
भुयारी स्टेशनांवर, सार्वजनिक विश्रामगृहांत, रहदारीच्या रस्त्यांवर आई नवजात बाळाला टाकून निघून जाते. कचरा गोळा करणाऱ्यांना कचराकुंडीत काहीवेळा चिमुकली मुले आई जवळ नसल्याने रडून-रडून थकल्याने निपचित पडलेली सापडली. ओ एस्तादो दे एस. पाऊलु यानुसार “मुलांना रस्त्यावर टाकण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.” अर्थात, मूल टाकून देणाऱ्या तरुण आईला कदाचित नंतर पस्तावा होईल. पण तरीही मुलाच्या जीवाला धोका असतानाही ती ते टाकून देते हे वास्तव.
‘तान्ह्या मुलाला टाकून देण्याचा विचार आईच्या मनात येतो तरी कसा?’ असा विचार कदाचित तुमच्या मनात येईल. आपल्या निर्माणकर्त्याला त्याच्या लोकांविषयी किती कळवळा आहे हे दाखवण्यासाठी पण बायबलमध्ये आपल्या मुलांनाही टाकून देणाऱ्या आईचे उदाहरण दिले आहे; आणि तिच्या तुलनेत आपल्या लोकांविषयी कळवळा वाटणारा आपला निर्माणकर्ता किती वेगळा आहे हे त्या उदाहरणातून दाखवले आहे: “स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.”—यशया ४९:१५.
खरोखरच आईच्या वात्सल्यापेक्षाही देव आपल्यावर जास्त प्रेम करतो आणि आपल्याला काय हवे, नको त्याकडे त्याचे सतत लक्ष असते. तुम्ही लहान असला किंवा मोठे असला, तुमची कोणतीही समस्या असली तरी तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या निर्माणकर्त्याला तुमची मदत करावी आणि तुमचे भले व्हावे असे मनापासून वाटते. स्तोत्रकर्त्याच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील.”—स्तोत्र २७:१०.
जगव्याप्त, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या पत्रिका “एकच खरा देव,” यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याविषयी ज्ञान पुरवतात आणि हे ज्ञान कदर दाखवून आत्मसात करणाऱ्यांना सार्वकालिक जीवन मिळू शकते.—योहान १७:३.