वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ८/१ पृ. ३२
  • कोण दोषास्पद आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कोण दोषास्पद आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ८/१ पृ. ३२

कोण दोषास्पद आहे?

अनेकजण आपल्या समस्यांसाठी देवाला दोष देतात. एक बायबल नीतिसूत्रे म्हणते: “मनुष्य आपल्याच मूर्खपणामुळे मार्गभ्रष्ट होतो आणि नंतर देवाविषयी मनात अढी बाळगतो.” (नीतिसूत्रे १९:३, द न्यू इंग्लिश बायबल) तथापि, मानवावर ओढवणाऱ्‍या अरिष्टांसाठी देवाला जबाबदार धरणे म्हणजे दारू पिऊन कार चालवल्यामुळे होणाऱ्‍या अपघातांसाठी कार बनविणाऱ्‍याला दोष देण्यासारखे आहे.

आपले वचन, बायबल यात देवाने मानवजातीसाठी मौल्यवान मार्गदर्शन पुरवले आहे. या ईश्‍वरी ग्रंथालयाचा अभ्यास केल्याने व त्यात घालून दिलेल्या नियमांच्या व तत्त्वांच्या अनुषंगाने आपले जीवन व्यतीत केल्याने जीवनातील अनेक खाचखळगे आपण टाळू शकतो. याच्या अगदी विपरीत, देवाच्या मार्गदर्शनाविरुद्ध काही कृत्य करणे प्राणघातक आहे. उदाहरणार्थ अधाशासारखे खाणारे, धूम्रपान करणारे, मद्यासक्‍त किंवा अनैतिकतेत गुरफटणारे लोक बहुधा भयंकर आरोग्य समस्यांना बळी पडतात. (लूक २१:३४; १ करिंथकर ६:१८; २ करिंथकर ७:१) ख्रिस्ती प्रेषित पौलाने लिहिले: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.”—गलतीकर ६:७, ८.

खरेच, देवाने दिलेल्या नियमांच्या व तत्त्वांच्या अनुषंगाने जीवन व्यतीत करणे किती तरी बरे! असे केल्यास देवाने यशया संदेष्ट्यामार्फत व्यक्‍त केलेले अभिवचन वास्तवात उतरल्याची अनुभूती आपल्याला होईल: “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.”—यशया ४८:१७, १८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा