वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ७/१५ पृ. ३२
  • ‘ऐक्याचा आणि बंधुत्वाचा नमुना’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘ऐक्याचा आणि बंधुत्वाचा नमुना’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ७/१५ पृ. ३२

‘ऐक्याचा आणि बंधुत्वाचा नमुना’

अशाप्रकारे एका स्त्रीने, यहोवाच्या साक्षीदारांच्या कृत्यांचे वर्णन केले; तिच्या कुटुंबातील एका सदस्याचा दुःखद मृत्यू झाला होता. ती म्हणते:

“माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या वतीने मी, जर्मनीच्या फ्रीबर्ग येथील इटालियन मंडळीच्या साक्षीदारांचे आभार मानू इच्छिते. माझा भाऊ ॲन्टोन्यो आणि त्याची पत्नी ॲना यांना सोडून आम्ही कोणीच यहोवाचे साक्षीदार नाही. आम्ही त्यांच्या धार्मिक निवडीची खूप वर्षांपर्यंत टीका केली, मात्र त्यांच्या धर्माचा नेहमी आदर केला आहे.

“परंतु, आता आम्ही आमचे मन बदलले पाहिजे. खरे तर, आम्हाला बंधुत्वाचा आणि प्रीतीचा इतका चांगला अनुभव आला आहे, की आम्हाला अशी कधीच अपेक्षा नव्हती.

“दुःखाची गोष्ट, ॲनाचा रस्त्यावरील एका अपघातात अकाली मृत्यू झाला. आम्ही इटलीतच राहत असल्यामुळे, माझा भाऊ ॲन्टोन्यो याला आणि त्याच्या मुलांना आम्ही काही काळापर्यंतच भावनिक आधार देऊ शकलो. परंतु, त्याचे साक्षीदार बंधू त्याच्या साहाय्यास आले. त्यांनी त्याला त्यांच्या उपस्थितीद्वारे, त्यांच्या बोलण्याद्वारे, त्यांच्या विश्‍वासाद्वारे, त्यांच्या शारीरिक, नैतिक व आर्थिक आधाराद्वारे मदत केली आहे. मी स्वतः तर मंडळीतील प्रत्येकाचे आभार मानू शकत नसल्यामुळे, तुमच्या नियतकालिकाद्वारे, आम्ही कधीही विसरू शकत नाही अशा त्यांच्या ऐक्य आणि बंधुत्वाच्या नमुन्याबद्दल आभार मानू इच्छितो.”

या स्त्रीच्या प्रांजळ टिप्पणीची कदर केली जाते. तिच्या निरीक्षणाप्रमाणे, यहोवाच्या साक्षीदारांचा आंतरराष्ट्रीय बंधुसमाज आहे. (१ पेत्र २:१७) प्रीती, “पूर्णता करणारे बंधन” आहे, हे माहीत असल्यामुळे ते एकमेकांमध्ये प्रेमाचे अतूट बंधन विकसित करतात. (कलस्सैकर ३:१४) सर्वात दुःखदायक परिस्थितीतही, जी आपल्या सर्वांवर कधी ना कधी येऊ शकते, यहोवाचे साक्षीदार देवाच्या आणि त्याच्या लोकांच्या अगदी जवळ राहतात.—नीतिसूत्रे १८:२४; उपदेशक ९:११; योहान १३:३४, ३५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा