कृपया आमच्याबरोबर एका खास कार्यक्रमास उपस्थित राहा शनिवार, एप्रिल ११, १९९८
देवाने आपल्याला त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त, बक्षीस म्हणून दिल्याबद्दल त्याची आठवण करण्याकरता यहोवाचे साक्षीदार तुमचे हार्दिक स्वागत करतात. या बक्षीसामुळे मानवजातीला पृथ्वीवर अनंतकालिक जीवनाची आशा लाभली आहे.—योहान ३:१६.
या वर्षी, येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी एप्रिल ११, शनिवारी सूर्यास्तानंतर साजरा केला जाईल. ही तारीख बायबलच्या चांद्र दिनदर्शिकेतील निसान १४ या तारखेची जुळते. सभेचे ठिकाण व समय याच्या योग्य माहितीकरता कृपया स्थानीय यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा.