वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 २/१५ पृ. ३२
  • देव जगाचा नाश करील का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव जगाचा नाश करील का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 २/१५ पृ. ३२

देव जगाचा नाश करील का?

पोप जॉन पॉल दुसरे यांच्या मते, मानव भवितव्याकडे आत्मविश्‍वासाने पाहू शकतात. संपूर्ण इतिहासात, “मानवांनी पाप केले आहे, कदाचित जलप्रलयाआधी केलेल्या पापांपेक्षाही घोर पाप ते करीत आले आहेत,” असे त्यांचे म्हणणे आहे. पण तरीदेखील, “नोहाबरोबर देवाने केलेल्या करारावरून आपल्याला कळते, की आता असे कोणतेही पाप नाही की ज्यामुळे स्वतः देवाने निर्माण केलेले जग त्याला नाश करावे लागेल,” असे पोपनी स्पष्टीकरण दिले.

देव खरेच जगाचा नाश करणार नाही का? बायबल म्हणते, की जलप्रलयानंतर देव नोहास म्हणाला: “पुनः जलप्रलयाने प्राणिमात्र नष्ट होणार नाहीत, आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुनः कधी व्हावयाचा नाही.” (उत्पत्ति ९:११) पोप म्हणतात, की ह्‍या शब्दांनी, “देवाने स्वतःशी एक करार केला की तो पुन्हा [पृथ्वीचा] नाश करणार नाही.”

सृष्टीकर्ता आपल्या ग्रहाचा नाश होऊ देणार नाही असे बायबल स्पष्टपणे सांगते. ते म्हणते: “पृथ्वीच कायती सदा कायम राहते.” (उपदेशक १:४) पण, जलप्रलयातून आणखी पुष्कळ शिकण्यासारखे आहे—ज्यावर पोपनी विवेचन मांडले नाही.

येशू म्हणाला होता, की आपल्या भावी उपस्थितीदरम्यानच्या काळात पृथ्वीवरील परिस्थिती, ‘नोहाच्या दिवसात होती त्यासारखी असेल.’ ‘तेव्हा जलप्रलय येऊन सर्व लोकांस वाहवून नेईपर्यंत त्यांनी लक्ष दिले नाही.’ (मत्तय २४:३७-३९) त्याचप्रकारे, प्रेषित पेत्राने लिहिले की, “तेव्हांच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला” त्याप्रमाणे ‘न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाच्या दिवसाची’ टांगती तलवार सद्य जगावर लटकत आहे.—२ पेत्र ३:५-७.

देवाने नोहाबरोबर केलेला करार येशू आणि पेत्र विसरून गेले होते का? नाही! नोहाशी करार करताना देवाने म्हटले, की जलप्रलयाकरवी तो या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करणार नाही. तर, “राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभु” असलेला येशू ख्रिस्त याच्या शक्‍तीचा तो उपयोग करून घेईल. (प्रकटीकरण [अपोकॅलिप्स] १९:११-२१) यास्तव, बायबलनुसार, पृथ्वीचा नाश होणार नाही तर दुष्ट मानवजातीच्या “जगाचा” नाश अटळ आहे. (नीतिसूत्रे २:२१, २२; प्रकटीकरण ११:१८) त्यानंतर, “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:२९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा