“सर्वात उत्तम इंटरलिनियर न्यू टेस्टमेंट असेल तर हेच”
असे डॉ. जेसन बिडून, द किंगडम इंटरलिनियर ट्रान्सलेशन ऑफ द ग्रीक स्क्रिप्चर्स याचे वर्णन करतात. ते म्हणतात:
“[यू.एस.ए], ब्लूमिंगटन येथील इंडियाना विद्यापीठाच्या धार्मिक अभ्यासांच्या विभागासाठी असलेला कोर्स मी अलीकडेच शिकवला. . . . हा कोर्स प्रामुख्याने शुभवर्तमानांचा आहे. द किंगडम इंटरलिनियर ट्रान्सलेशन ऑफ द ग्रीक स्क्रिप्चर्स प्रतींच्या रूपाने आम्हाला तुमचे साहाय्य मिळाले; माझ्या विद्यार्थ्यांनी वर्गासाठी इतर पाठ्यपुस्तकांसोबत यांचाही पाठ्यपुस्तक म्हणून उपयोग केला. हे लहान खंड कोर्ससाठी अत्यंत मौल्यवान व माझ्या विद्यार्थ्यांच्या अगदी परिचयाचे होते.”
डॉ. बिडून आपल्या कॉलेज कोर्सेससाठी किंगडम इंटरलिनियर भाषांतराचा उपयोग का करतात बरे? तेच स्वतः याचे उत्तर देतात: “सर्वात उत्तम इंटरलिनियर न्यू टेस्टमेंट असेल तर हेच. मी प्रशिक्षित बायबल अभ्यासक आहे, आधुनिक बायबलच्या अभ्यासांमध्ये वापरत असलेले पाठ आणि साधन यांच्याशी मी चांगला परिचित आहे; पण, बरं का मी काही यहोवाचा साक्षीदार नाही. दर्जेदार प्रकाशन मला पाहता क्षणीच ओळखू येते, आणि तुमच्या ‘नवे जग बायबल भाषांतर समितीने’ याबाबतीत खरंच कमाल केली आहे. तुमचे इंटरलिनियर इंग्रजी भाषांतर इतके अचूक व सुसंगत आहे की, ते वाचकाला ग्रीक बोलणाऱ्या जगामधील आणि आपल्या जगामधील भाषासंबंधी, सांस्कृतिक आणि कल्पनात्मक खिंडारीचा गंभीर विचार करावयास भाग पाडते. तुमचे ‘नवे जग बायबल भाषांतर’ उत्तम दर्जाचे आहे, ग्रीकशी विश्वासू राहूनच पारंपरिक चुकीचे अनुवाद टाळणारे ते शब्दशः भाषांतर आहे. ते, अनेक प्रकारे आज वापरात असलेल्या सर्वात प्रसिद्ध भाषांतरांपेक्षा श्रेष्ठ आहे.”
द किंगडम इंटरलिनियर ट्रान्सलेशन ऑफ द ग्रीक स्क्रिप्चर्स, देवाच्या वचनाच्या चाहत्यांना बायबलच्या मूळ ग्रीक पाठ्याशी परिचित होण्यास साहाय्य व्हावे म्हणून यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले आहे. त्यामध्ये, पानाच्या डाव्या बाजूला (बी. एफ. वेस्टकॉट आणि एफ. जे. ए. हॉर्ट यांनी संकलन केलेले) द न्यू टेस्टमेंट इन द ओरिजिनल ग्रीक आहे. ग्रीक पाठाच्या खालोखाल इंग्रजीचे शब्द-न-शब्द भाषांतर दिले आहे. उजव्या बाजूच्या लहानशा रकान्यात न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स दिले आहे ज्यामुळे तुम्ही इंटरलिनियर भाषांतराची तुलना बायबलच्या आधुनिक इंग्रजी भाषांतराशी करू शकता.