नाताळ प्रापंचिक सुटीचा दिवस की धार्मिक सणाचा दिवस?
चीनमध्ये त्याला ख्रिसमस ओल्ड मॅन असे संबोधण्यात येते. संयुक्त राज्यात फादर ख्रिसमस म्हणून तो ज्ञात आहे. रशियातील लोक त्याच्यासाठी ग्रॅण्डफादर फ्रोस्ट हे नाव वापरतात आणि संयुक्त संस्थानांत त्याला सांटा क्लॉज या नावाने पुकारण्यात येते.
पांढरी शुभ्र दाढी असलेला व नेहमी आनंदी असणारा असा स्थूल शरीराचा, वृद्ध सांटा क्लॉज म्हणजे ख्रिसमसचे मूर्तिमंत उदाहरण, असा अनेक जणांचा विचार आहे. आणि लोकांना याचीही कल्पना आहे, की सांटा क्लॉज काल्पनिक कथा आहे अर्थात चौथ्या शतकातील मुर्याच्या (आधुनिक दिवसातील तुर्क) बिशपसंबंधित असलेल्या परंपरांवर आधारलेली दंतकथा.
रूढींनी आणि परंपरांनी सणांवर नेहमीच चांगला प्रभाव पाडला आहे आणि ख्रिसमस या गोष्टीला अपवाद नाही. पारंपरिक कथेचा लोकप्रिय सणाशी संबंध लागण्याचे एक उदाहरण म्हणजे सांटाची पुराणकथा. ख्रिसमसच्या चालीरीती बायबलमधील गोष्टींना धरून आहेत असा अनेक लोकांचा दावा असला, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांतील बहुतेक चालीरीतींचा उगम मूर्तिपूजक धर्मांतून झाला आहे.
त्यानंतर उदाहरण देता येईल ते ख्रिसमस वृक्षाचे. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणते: “मूर्तिपूजक युरोपीय लोकांमध्ये वृक्षाची पूजा करण्याची प्रथा सामान्य होती, ख्रिस्ती विश्वासात त्यांचे धर्मांतर झाल्यानंतरही या प्रथांमध्ये नूतन वर्षी घर आणि कोठार हिरव्यागार झाडांनी सजवण्याची स्कॅनडिनॅव्हियन परंपरा कायम राहिली; दियाबलाला घालवण्यासाठी आणि ख्रिसमसच्या काळात पक्षांकरता वृक्ष तयार केले जात.”
सदापर्णी किंवा हिरव्यागार झाडांची पुष्पांजली तयार करणे, ही एक ख्रिसमसची सर्वज्ञात परंपरा आहे. या परंपरेचाही उगम झाला तो मूर्तिपूजक उपासनेतूनच. प्राचीन रोमी लोक सॅटरनालियाच्या काळात मंदिराची सजावट करण्यासाठी सदापर्णी वृक्षांच्या डहाळ्या वापरत; शेतकी देवता, सॅटरच्याप्रीत्यर्थ ऐन हिवाळ्यात हा सात दिवसांचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असे. हा मूर्तिपूजक सण विशेषतः प्रसिद्ध होता तो बेबंद मौजमजा आणि उच्छृंखलपणासाठी.
मिस्टलटोच्या (येथे दाखविण्यात आले आहे) डहाळीच्या खाली चुंबन घेणे काही जणांना रोमँटिक वाटेल, परंतु यामुळे मध्ययुगाची आठवण होते. प्राचीन ब्रिटनचे पाळक असा विश्वास करत, की मिस्टलटोच्या फांदीमध्ये एक प्रकारची जादुई शक्ती असे; यास्तव भूतप्रेत, मंत्रतंत्र, आणि यांसारख्या इतर वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्या फांदीचा उपयोग करण्यात येत असे. मिस्टलटोच्या डहाळीखाली चुंबन घेतल्याने विवाह होतो, या अंधश्रद्धेचाही कालांतराने जन्म झाला. अद्यापही नाताळाच्या काळात काही लोकांमध्ये ही अंधश्रद्धा प्रचलित आहे.
मूर्तिपूजक शिकवणींनी प्रभावित झालेल्या किंवा थेटपणे त्यातून निघालेल्या आजच्या ख्रिसमस परंपरातील या काही परंपरा. पण, हे सर्व झाले तरी कसे, असा विचार तुमच्या मनात येईल. जो सण येशूच्या जन्मदिवसाचा आदर करण्याचा दावा करतो तो अख्रिस्ती परंपरांमध्ये कसा काय पडला? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवाचा या बाबतीत कोणता दृष्टिकोन आहे?
[Picture Credit Line on page 2]
पृष्ठ ३: सांटा क्लॉज: Thomas Nast/Dover Publications, Inc., 1978; पृष्ठ ३ वर मिस्टलटो आणि पृष्ठ ४ वर चित्र: Discovering Christmas Customs and Folklore by Margaret Baker, published by Shire Publications, 1994