वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १२/१ पृ. ३२
  • दहा आज्ञा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दहा आज्ञा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १२/१ पृ. ३२

दहा आज्ञा

इंग्लंडमधील ग्लॉस्टरच्या बिशपांना आढळून आले, की त्यांच्या अधिकाराखालील प्रदेशात असलेल्या पाळकवर्गापैकी निम्या वर्गाला दहा आज्ञा बोलून दाखवता येत नव्हत्या, आणि त्यांतील १० टक्क्यांना हेही माहीत नव्हते की त्या बायबलमध्ये कोठे आहेत. ही ४५० वर्षांपूर्वीची गोष्ट होती. पण तेव्हापासून आता परिस्थिती सुधारली आहे का? मुळीच नाही. अलीकडील संडे टाईम्सने अँग्लिकन पाळकांच्या घेतलेल्या अनियत सर्वेक्षणाद्वारे त्याची प्रचिती झाली.

मुलाखत घेतलेल्या २०० पाळकांपैकी, केवळ ३४ टक्के पाळक सर्व दहा आज्ञा बोलून दाखवू शकले. उरलेल्यांपैकी एकाला वाटले की त्या आज्ञा फारच बंधनकारक आहेत व दुसऱ्‍याने तर, त्या आधुनिक नैतिक समस्यांकरता उचित नाहीत असे म्हणून त्यांना नाकारले.

तुम्ही दहा आज्ञांशी अवगत आहात का किंवा त्या कोठे सापडतील हे तुम्हाला माहीत आहे का? त्या, बायबलच्या दुसऱ्‍या पुस्तकात अर्थात निर्गमच्या पुस्तकातील २० व्या अध्यायाच्या पहिल्या १७ वचनात आहेत. तुम्ही वाचाल का? त्यांना लक्षात ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे. पहिल्या चार आज्ञा देवाची उपासना कशी करायची त्याजशी संबंधित आहेत, पाचवी आज्ञा कौटुंबिक जीवनावर जोर देते, सहा ते नऊ आज्ञा आपल्या सहकाऱ्‍यांबरोबर आपले नाते कसे असले पाहिजे ते सांगतात आणि दहावी आज्ञा अद्वितीय आहे, ती आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करण्याचे, आपले हेतू पारखण्याचे उत्तेजन देते. ख्रिस्ती जन तत्त्वांना कशाप्रकारे लागू करू शकतात याचे संक्षिप्त वर्णन खाली दिले आहे.

पहिली: आपल्या निर्माणकर्त्याला अनन्य भक्‍ती द्या. दुसरी: उपासनेत मूर्त्यांचा उपयोग करू नका. तिसरी: देवाच्या नावाचा नेहमीच आदर व त्याची प्रतिष्ठा करा. चौथी: विकर्षणाविना आध्यात्मिक बाबींवर मन एकाग्र करण्यास वेळ काढा. पाचवी: मुलांनो, पालकांचा आदर करा. सहावी: खून करू नका. सातवी: व्यभिचार टाळा. आठवी: चोरी करू नका. नववी: सत्य बोला. दहावी: लोभीपणापासून दूर राहा.

दहा आज्ञा, मोशेला देण्यात आलेल्या नियमसंहितेच्या भाग होत्या. पण त्यात अंतर्भूत असलेली तत्त्वे सर्वकाळासाठी आहेत. (रोमकर ६:१४; कलस्सैकर २:१३, १४) याच कारणास्तव, येशूच्या अनुयायांनी दहा आज्ञा उद्धृत केल्या व त्यांचा उल्लेखही केला. (रोमकर १३:८-१०) सर्वजन या ईश्‍वरप्रेरित तत्त्वांचा आदर करून त्यांना धरून चालले असते तर जीवन आज किती सौख्यमय, किती सुरक्षित बनले असते!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा