वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ११/१५ पृ. ३२
  • लाभदायक ठरलेल्या निद्रारहित रात्री

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लाभदायक ठरलेल्या निद्रारहित रात्री
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ११/१५ पृ. ३२

लाभदायक ठरलेल्या निद्रारहित रात्री

राजांनी देखील निद्रारहित रात्रींचा अनुभव घेतला. सा. यु. पू. पाचव्या शतकातील सामर्थ्यशाली पर्शियन राजा, अहश्‍वेरोश याला देखील एकदा निद्रारहित रात्रीचा अनुभव आला. कामगिरीकडे कदाचित आपण दुर्लक्ष तर केले नाही ना, असे वाटल्याने त्याला राजदरबारातील अहवाल वाचून दाखविण्यात आले. तेव्हा त्याला असे आढळून आले की, आपल्यावर होणाऱ्‍या खुनी हल्ल्याचा बेत, विश्‍वासू सेवक, मर्दखय याने फोल ठरवला तरी त्याला गौरवण्यात आले नव्हते. अहश्‍वेरोश याने तत्काळ या देखरेखीमध्ये सुधारणा करण्याचा निश्‍चय केला. त्याने केलेल्या कार्यवाहीमुळे देवाच्या लोकांना झालेल्या लाभदायक परिणामांमुळे हे सूचित होते, की राजाच्या निद्रानाशामागे देवाचा हात होता.—एस्तेर ६:१-१०.

दक्षिण आफ्रिकेच्या समुद्रकिनाऱ्‍यावरील हरमॉनस या शहरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीच्या बाबतीत बायबलमधील या भागाचे स्मरण करणे उचित आहे. ते एका भाड्याच्या सभागृहात एकत्र येत असत. त्यांनी अनेक वर्षे स्वतःचे राज्य सभागृह बांधण्यासाठी जागा विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. कालांतराने, सन १९९१ मध्ये नगर परिषदेने त्यांना एक मोक्याची जागा प्रस्तुत केली.

तथापि, काही जणांनी ही जागा यहोवाच्या साक्षीदारांना देण्यास विरोध केला. ही जागा चर्चेसला विकण्यावर तीन वर्षांचे अधिस्थगन लावण्यात आल्याचे आणि ही जागा देऊ करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचे, या मंडळीला कित्येक महिन्यांनंतर कळवण्यात आले. घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विनंती या मंडळीने मे, १९९३ मध्ये पुन्हा एकदा केली. अधिस्थगन अद्यापही लागू आहे, असे एका वाक्यात या मंडळीला त्यांच्या पत्राचे उत्तर मिळाले.

त्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात, त्या परिषदेच्या एका स्त्री-सदस्याला एके रात्री झोप लागली नाही. कोणत्या गोष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे, हे पाहण्यासाठी परिषदेच्या जुन्या अहवालाच्या नोंदी पाहण्यात त्या वेळ घालवत होत्या. तेव्हा साक्षीदारांनी लिहिलेल्या पत्राकडे त्यांचे लक्ष गेले; परिषदेने आपल्या निर्णयावर पुनःविचार करावा, असे त्या पत्रात लिहिण्यात आले होते. अशा प्रकारे त्यांनी या विषयावर पुढील सभेत चर्चा करण्याचे ठरवले. चर्चेसला जागा देण्याचे अधिस्थगन लावण्याआधी यहोवाच्या साक्षीदारांनी त्या जागेसाठी अर्ज केला होता, हे तिला दाखवायचे होते.

योग्य वेळी या मंडळीला ती जागा देण्यात आली जी त्यांना सुरवातीला, म्हणजे १९९१ मध्ये सादर करण्यात आली होती! ही जागा मुख्य रस्त्यावर आहे, मंडळीचे सदस्य आणि आस्थेवाईक यांच्यासाठी सोईस्कर आहे. त्यांनी त्या जागेवर आता एक सुंदर राज्य सभागृह बांधले आहे ज्याचे ऑक्टोबर ५, १९९६ रोजी यहोवाला समर्पण करण्यात आले.

परिषदेच्या स्त्री-सदस्याने अनुभवलेल्या निद्रारहित रात्रीमुळे या मंडळीला खेद वाटतो, पण त्यांचे या वास्तविकतेने सांत्वन होऊ शकते, की राजा अहश्‍वेरोश याला देखील एक रात्र निद्रारहित घालवावी लागली होती. या दोन्ही बाबतींत परिणाम लाभदायक होते. हरमॉनस येथील ही मंडळी स्वतःचे राज्य सभागृह असल्यामुळे फार कृतज्ञ आहे; हे राज्य सभागृह या लोकप्रिय समुद्रकिनाऱ्‍यावरील शहरातील शुद्ध उपासनेचे आणि ईश्‍वरशासित प्रशिक्षणाचे केंद्र आहे.—इब्री लोकांस १०:२४, २५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा