नेक मुले वाढवणे—अजूनही शक्य आहे का?
कॅनडाच्या ओटावा येथील वान्या इन्स्टिट्यूट फॉर द फॅमिली नामक संस्थेत काम करणाऱ्या रॉबर्ट ग्लॉसप यांचे असे म्हणणे आहे की, “एक नैतिकसंहिता नसलेल्या एका क्लिष्ट, बहुजिनसी समाजात आपण आज जगत आहोत.” याचा परिणाम काय झाला आहे? द टोरोन्टो स्टार नामक दैनिकातील एक रिपोर्ट म्हणतो: “कौमार्यावस्थेतील गर्भधारणा, तरुणांतील हिंसा आणि कौमार्यांची आत्महत्या, या गोष्टींना ऊत आला आहे.”
ही समस्या केवळ उत्तर अमेरिकेचीच नाही. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ऱ्होडे टापूवरील ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटचे संचालक बिल डेमन यांनी, ब्रिटन आणि इतर युरोपीय राष्ट्रांत तसेच ऑस्ट्रेलिया, इस्राएल आणि जपान या देशांतील समस्या अभ्यासल्या. त्यांच्यामते, तरुणांना मार्गदर्शन देणारे चर्चेस, शाळा आणि इतर संस्था ऱ्हास झाल्याचा हा परिणाम आहे. त्यांना वाटते, की “मुलांची सुवृत्ती व क्षमता उत्पन्न करण्याकरता ज्याची आवश्यकता आहे याची आपल्या समाजाला जाणीव नाही.” “शिस्त मुलांच्या आरोग्याला व कल्याणाला हानीकारक असते,” असे शिकवणाऱ्या पालक तज्ज्ञांचा उल्लेख करत डेमन ठामपणे म्हणतात की, “हे तर हट्टी, आज्ञाभंजक मुले वाढवण्याचे मंत्र आहे.”
आजच्या तरुणांना नेमके काय हवे आहे? त्यांना सतत मन व अंतःकरण यांची सुधारणा करणारे प्रेमळ शिक्षण हवे आहे. विविध तरुणांना विविध प्रकारच्या शिस्तीची गरज असते. बहुधा तर्क करून प्रेमाने शिस्त लावता येते. म्हणूनच नीतिसूत्रे ८:३३ येथे आपल्याला, ‘बोध ऐका’ असे सांगितले आहे. परंतु काहीजण केवळ “शब्दांनी सुधारत” नसतात. त्यांना, आज्ञाभंग केल्याबद्दल योग्य प्रमाणात उचित शिक्षेची आवश्यकता भासेल. (नीतिसूत्रे १७:१०; २३:१३, १४; २९:१९) असे सुचवताना बायबल, मुलाला इजा किंवा दुखापत पोहंचेल अशा तऱ्हेने रागाच्या भरात रपाटे द्यावेत किंवा झोडून काढावे असे म्हणत नाही. (नीतिसूत्रे १६:३२) त्याऐवजी, मुलाला हे कळले पाहिजे की त्याची सुधारणूक का केली जात आहे आणि पालकांना त्याच्या कल्याणाची काळजी आहे याची त्याला जाणीव झाली पाहिजे.—पडताळा इब्री लोकांस १२:६, ११.
अशा प्रकारचा बायबल आधारित व्यावहारिक आणि यथायोग्य सल्ला कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य नामक पुस्तकात दिला आहे.