वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ९/१ पृ. ३
  • वृद्धांसाठी कठीण काळ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वृद्धांसाठी कठीण काळ
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ती कुटुंब वयस्करांना मदत देते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • वयोवृद्धांची काळजी वाहणे —ख्रिस्ती जबाबदारी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • वयस्करांच्या हिताकडे दृष्टी ठेवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • आपल्या वृद्ध पालकांचा सन्मान करणे
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ९/१ पृ. ३

वृद्धांसाठी कठीण काळ

ममा ऑनियन ह्‍या ६८ वर्षांच्या असून पश्‍चिम आफ्रिकेच्या एका प्रमुख शहरात त्या राहतात. जीवनाच्या संध्याछायेत पोहंचण्यापूर्वी त्यांनी असा विचार केला होता, की कामातून निवृत्त झाल्यानंतर त्या मुलांच्या आणि नातवंडांच्या सहवासात असतील. पण आता मात्र त्या दुपारच्या तळपत्या उन्हात थंड पाणी विकून कसेबसे दिवस काढत आहेत. जे काही थोडेबहुत पैसे मिळतात त्यांवर त्यांची गुजराण होते. त्यांची दोन मुले दूर परदेशात आहेत. आणि कित्येक दिवसांपासून या मुलांनी त्यांना पैसेही पाठवलेले नाहीत.

आफ्रिकेत भूतकाळामध्ये वृद्धांचा फार सन्मान केला जात असे. त्यांच्या अनुभवामुळे आणि ज्ञानामुळे अनेकांच्या मनांत त्यांच्याविषयी आदर होता तसेच त्यांच्यामुळे इतरांना सुज्ञान आणि समंजसपणा प्राप्त होत असे. ही वृद्ध मंडळी त्यांच्या नातवंडांना सुद्धा लहानाचे मोठे करत असे. युवकजन त्यांचा सल्ला आणि त्यांचे म्हणणे ऐकत असत. लोक बायबलच्या सल्ल्यानुसार जीवन कंठत होते: “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे.”—लेवीय १९:३२.

परंतु आता काळ बदलला आहे. गरिबी, महागाई, बेरोजगारी आणि शहरांकडे येणारा लोकांचा लोंढा यांमुळे वृद्धांना कोणाच्याही मदतीविना जीवन कंठावे लागत आहे. हेल्पऐज केनिया याचे व्यवस्थापक, कॉमिलस वेअर म्हणतात: “वृद्ध लोकांना आधार देण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची परंपरा जवळजवळ काळाच्या पडद्याआड गेली आहे.”

अर्थात, कौटुंबिक बंधन कमजोर होण्याची बाब केवळ आफ्रिकी देशांतच पाहायला मिळते असे नाही. जपान या देशाविषयी गार्डियन विकली हे साप्ताहिक अहवाल देते: “संतानीय श्रद्धा जपानी जीवनमानाच्या पद्धतीचा केवळ आधारच नव्हती तर कन्फ्युशीॲनिझमची एक देणगी देखील होती, पण ही श्रद्धा शहरीकरणासमोर आणि कमकूवत होणाऱ्‍या कौटुंबिक बंधनासमोर तग धरू शकली नाही: आज जपानमधील ८५ टक्के लोक इस्पितळांत किंवा वृद्धाश्रमांत मरण पावतात.”

परिस्थिती कोणतीही असली तरी, देवाला आनंदी करण्याची खरोखर इच्छा बाळगणारे त्यांच्या पालकांचा आदर करतात. ते बायबलमधील सल्ल्याकडे लक्ष देतात: “आपला बाप व आई ह्‍यांचा मान राख, ह्‍यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.” (इफिसकर ६:२, ३) वृद्ध पालकांना आदर देणे आणि त्यांची काळजी घेणे नेहमीच इतके सोपे नसते, परंतु असे केल्याने फार मोठी प्रतिफळे प्राप्त होऊ शकतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा