वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ८/१५ पृ. २-४
  • संकटकाळी तरलेले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संकटकाळी तरलेले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • निकडीचा काळ
  • जीवन निवडून घ्या
  • देवाचे राज्य काय साध्य करील
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • देवाचा उद्देश लवकरच पूर्ण होणार
    जीवनाचा काय उद्देश आहे?
  • काळजी वाहणारा देव आहे?
    काळजी वाहणारा देव आहे का?
  • ‘जीवन निवडून घे म्हणजे तू जिवंत राहशील’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ८/१५ पृ. २-४

संकटकाळी तरलेले

सेऊल, कोरिया येथे एका डिपार्टमेंट स्टोरची पाचमजली इमारत आकस्मिकपणे जमीनदोस्त झाली, शेकडो लोक ढिगाऱ्‍याखाली गाडले गेले! बचाव कार्यकर्ते होता होईल तितक्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस झटत होते. एकेक दिवस जात होता तसतशी, काँक्रीट आणि पोलादाच्या ढिगाऱ्‍यांखालून आणखी काही लोक जिवंत सापडण्याची शक्यता हळूहळू कमी होऊ लागली.

सर्वांनी आशा सोडल्यावर मात्र, काहीतरी विलक्षण घडले. त्या दगड-विटांच्या ढिगाऱ्‍याखालून कण्हण्याचा मंद आवाज ऐकू आला. बचाव कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, अक्षरशः आपल्या हातांनी त्या ढिगाऱ्‍यांत शोधाशोध केली, तेव्हा त्यांना तब्बल १६ दिवसांपासून जिवंत गाडलेल्या स्थितीत एक १९ वर्षांची मुलगी सापडली. कोलमडलेल्या लिफ्टच्या कूपकात सापडल्यामुळे तिच्याभोवती एक पिंजरा तयार झाला आणि कितीतरी टन काँक्रीट त्यावर आदळले तरीसुद्धा ती सुरक्षित राहिली. तिला वाईट रितीने डिहायड्रेशन झाले होते आणि खूप जखमा देखील झाल्या होत्या, पण मृत्यूच्या तावडीतून मात्र ती सुखरूप बचावली!

आजकाल, कोणत्या न कोणत्या आपत्तीचे बातमीवृत्त न मिळता एकही महिना जात नाही, मग तो एखादा भूकंप असो, भयंकर वादळ असो, ज्वालामुखीचा उद्रेक, दुर्घटना किंवा दुष्काळ असो. बातमीवृत्तांवर नियमाने लक्ष ठेवणारे लोक, बचाव कार्यहालचाली व जिवंत बचावलेले यांविषयीची थरारक वृत्ते मोठ्या उत्सुकतेने आणि जिज्ञासुपणे जाणून घेतात. तथापि, मानवी इतिहासात आलेल्या इतर कोणत्याही आपत्तीपेक्षा कितीतरी मोठी अशी एक आपत्ती येण्याविषयीच्या पूर्वसूचनेकडे—सर्वसामान्यपणे दुर्लक्षच करण्यात आले आहे. (मत्तय २४:२१) बायबल, येणाऱ्‍या या घटनेचे पुढील शब्दांत वर्णन करते: “पाहा, राष्ट्राराष्ट्रांतून अरिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अति दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्‌भवेल. त्या दिवशी परमेश्‍वराने संहारिलेले, पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील; त्यांकरिता कोणी शोक करणार नाही, त्यांस कोणी उचलणार नाही, पुरणार नाही; ते भूमीला खत होतील.”—यिर्मया २५:३२, ३३.

किती धक्कादायक शब्द! पण नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांच्या वेळी होते तसा अंधाधुंद नरसंहार या आपत्तीच्या वेळी होणार नाही. खरे तर यातून बचावणे—तुमचे बचावणे—शक्य आहे!

निकडीचा काळ

ही गोष्ट पूर्णपणे समजून घेण्यासाठी, ही जगव्याप्त आपत्ती मुळात का येणार आहे हे पहिल्यांदा समजून घेणे आवश्‍यक आहे. खरे पाहता ही आपत्तीच, मानवजातीच्या सर्व समस्यांवरील एकमात्र तरणोपाय आहे. आज फार कमी लोकांना सुरक्षित आणि निर्धास्त वाटते. विज्ञानाने प्रयत्नांची पराकाष्टा करूनही, संसर्गजन्य रोग पृथ्वीच्या रहिवाशांचे अविरतपणे बळी घेत आहेत. धार्मिक, जातीय आणि राजनैतिक मतभेदांमुळे घडणाऱ्‍या युद्धांत, हजारोंच्या संख्येने लोकांचे जीव जातात. दुष्काळ, निरपराध स्त्रीपुरुषांच्या आणि मुलांच्या त्रासात व दुःखात आणखी भर घालतात. नैतिक अवनतीमुळे समाजाचा पायाच ढासळत चालला आहे; विशेष म्हणजे, लहान मुलांनाही भ्रष्ट करण्यात आले आहे.

आजपासून १,९०० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका बायबलच्या भविष्यवाणीत आपल्या या परिस्थितीचे मोठ्या उल्लेखनीयरित्या अचूक वर्णन केलेले आहे. त्यात असे म्हटले आहे: “हे जाण की, शेवटल्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील.”—२ तीमथ्य ३:१, पं.र.भा.; पडताळा मत्तय २४:३-२२.

एक प्रेमळ देव आपली दशा पाहूनही बेपर्वा असेल हे तुमच्या तर्कबुद्धीला पटते का? बायबल म्हणते: “तोच देव, [“खरा देव,” NW] पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच, . . . त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” (यशया ४५:१८) या सर्वांगसुंदर ग्रहाची नासाडी होऊ देण्याऐवजी आणि त्यावरील सर्व रहिवाशांचा नाश होऊ देण्याऐवजी, देव हस्तक्षेप करील. पण प्रश्‍न असा उद्‌भवतो की, तो हे कसे करील?

जीवन निवडून घ्या

बायबल, स्तोत्र ९२:७ येथे याचे उत्तर देते: “दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच.” पृथ्वीच्या समस्यांवर देवाचा उपाय कोणता, तर दुष्टपणाचाच समूळ नाश. पण आनंदाची गोष्ट अशी की, सर्वच लोकांचा समूळ नाश करावा लागेल असा याचा अर्थ नाही. स्तोत्र ३७:३४ आपल्याला खात्री देते: “परमेश्‍वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्‍नति करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.”

या शब्दांतून दिसून येते, की मानवजातीवर येणाऱ्‍या सर्वात भयंकर आपत्तीतून बचावाची संधी आहे. देवाने आपल्याला निवड करण्याची संधी दिली आहे. वाग्दत्त देशात प्रवेश करण्याच्या बेतात असताना इस्राएल लोकांना मोशेने ज्या शब्दांत प्रोत्साहन दिले होते ते शब्द आपल्यासाठीही आज तितकेच सयुक्‍तिक आहेत: “जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील.” (अनुवाद ३०:१९) तथापि, ‘जीवन निवडून घेण्यासाठी’ आणि स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी एखाद्याने नेमके काय करावे? खऱ्‍या अर्थाने तारले जाणे म्हणजे नेमके काय?

[Picture Credit Line on page 2]

COVER: Explosion: Copyright © Gene Blevins/Los Angeles Daily News

[Picture Credit Line on page 3]

Yunhap News Agency/Sipa Press

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा