वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ८/१ पृ. ३०
  • पुस्तकेच पुस्तके!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पुस्तकेच पुस्तके!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ८/१ पृ. ३०

पुस्तकेच पुस्तके!

“पुष्कळ पुस्तके लिहिण्याला काही अंत नाही,” असे प्राचीन काळातील शलमोन राजाने लिहिले. (उपदेशक १२:१२; पं.र.भा.) ब्रिटनमध्ये १९९५ सालादरम्यान, ५८० लोकांकरता सरासरी एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते; यामुळे, नवीन पुस्तके प्रकाशित करण्यात त्या देशाने सबंध जगभरात अग्रस्थान पटकावले. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने, ब्रिटनच्या ९५,०१५ याच्या तुलनेत ९२,९७२ आवृत्त्या प्रकाशित करून दुसऱ्‍या क्रमांकाचे स्थान पटकावले. त्यानंतर जर्मनी (६७,२०६ पुस्तके), आणि मग संयुक्‍त संस्थाने (४९,२७६) व त्याच्या पाठोपाठ फ्रान्स (४१,२३४) हा देश आला. “केवळ इंग्रजी भाषेमुळे पुष्कळशा प्रमाणात ब्रिटन जगामध्ये अग्रस्थानी आला आहे,” असे लंडनचे वृत्तपत्र द डेली टेलिग्राफ टिपणी करते.

अहवाल दाखवून देतात, की कित्येक वर्षांपासून पुस्तक विक्रीच्या बाजारपेठेत मरगळ आली असून ब्रिटनमधील केवळ ८० टक्के प्रौढ लोक वर्षभरात एखाददोन पुस्तके खरेदी करतात. परंतु, लोक खरेदी करत असलेली सगळीच पुस्तके वाचतात का?

ज्या एका पुस्तकाचे विस्तृतपणे वितरण व वाचन होत आहे ते म्हणजे बायबल; सध्या २,१२० हून अधिक भाषांमध्ये त्याचे काही भाग अथवा ते संपूर्णतः उपलब्ध आहे. तुमच्याजवळ अद्याप तुमची स्वतःची प्रत नसल्यास ती प्राप्त करण्यासाठी वॉच टावर संस्थेच्या सर्वात जवळ असलेल्या दफ्तराशी संपर्क साधा. तुमच्याजवळ बायबल असल्यास ते काढून, या नियतकालिकांतील लेखांमध्ये आढळणारे शास्त्रवचनीय संदर्भ पडताळून पाहा. असे केल्याने, बायबलचे जीवनदायी ज्ञान तुमच्या हाती लागेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा