“सत्याची रत्ने”
“सत्याची रत्ने.” अशाप्रकारे, दोन खास नियतकालिकांबद्दल यहोवाच्या साक्षीदारांच्या नायजेरिया शाखेत आलेले एक पत्र वर्णन करते. पत्र लिहिणारा तरुण स्पष्ट करतो:
“टेहळणी बरूज आणि सावध राहा! या नियतकालिकांद्वारे दररोजच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक पैलूवर सूचना देण्याच्या तुमच्या प्रयत्नांबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्याकरिता मी हे पत्र लिहित आहे.
“मी १७ वर्षांचा आहे. गेल्या वर्षी, ‘प्रेम म्हणजे फक्त शरीरसंबंधच नव्हे—एड्स वास्तविक आहे’ या विषयावर एका स्थानिक रेडिओ केंद्राने निबंध स्पर्धा आयोजित केली. प्रत्येक निबंध चारशे शब्दांचा किंवा त्यापेक्षा जास्त असावयास हवा होता. उत्कृष्ट निबंधाला १,००० नायरा [१२.५० अमेरिकन डॉलर] हे बक्षीस देण्यात येणार होतं. आणि हो, त्यांनी सांगितलं की लोकांनी केवळ बक्षीस मिळवण्यासाठीच लिहू नये, तर त्याद्वारे काहीतरी शिकण्याकरता लिहावे . . . .
“या दोन्ही नियतकालिकांमध्ये मला एड्सविषयीची माहिती सापडली. प्रेम या विषयासंबंधी, तर लेखांचा खजिनाच होता. मी, सावध राहा! ऑगस्ट ८, १९७८, (इंग्रजी) यामधील मुद्दे घेतले.
“मी निबंध पाठवण्याच्या दोन महिन्यांनंतरच निकाल जाहीर करण्यात आले. क्रॉस रिवर आणि ऑक्वा ईबम या राज्यांत मी पहिला आलो, यावर माझा विश्वासच बसेना!
“त्यामध्ये लिहिलेली सर्व माहिती मला नियतकालिकांतून मिळाली होती. या त्रस्त आणि भ्रष्ट जगात, यहोवा आपल्याला समयोचित माहिती पुरवत आहे हे खरंच अद्भुत आहे. खरे ख्रिस्ती या नात्याने, आपल्याला माहीत आहे की प्रेम म्हणजे फक्त शरीरसंबंधच नव्हे तर आणखीन खूप खूप काही आहे. त्याचप्रमाणे शुद्ध, नैतिक जीवन आपल्याला एड्ससारख्या आजारांपासून वाचवते.
“तुम्ही इतक्या परिश्रमाने ही मौल्यवान रत्ने तयार करता त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे. आम्हाला ही मौल्यवान नियतकालिके पुरवण्याच्या तुमच्या प्रयत्नांवर यहोवाचे निरंतर आशीर्वाद राहोत.”