यहोवाचे साक्षीदार येतात तेव्हा
यहोवाच्या साक्षीदारांपैकी कोणी कॅथलिक लोकांच्या घरी येते तेव्हा त्यांनी काय करण्यास हवे? इटालियन बिशप्स कॉन्फरन्सच्या नॅशनल कॅटिकिस्टिक ब्यूरो याद्वारे तयार करण्यात आलेले अलीकडील प्रकाशन म्हणते: “याबाबतीत सौम्यतेने परंतु ठामपणे नकार देणे म्हणजे निर्दयीपणा नाही.”
या विचाराशी सर्वच कॅथलिक सहमत नाहीत, जसे फॉजा, इटलीतील रहिवासी असणाऱ्या एकाने गाज्जेटा देल मेदजोजॉर्नो या दैनिकाला लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते:
“मी यहोवाचा साक्षीदार नाही. मी एक कॅथलिक इसम आहे. परंतु चर्च त्याच्या सदस्यांवर जे खास नियम थोपवते त्याचे मला आश्चर्य वाटते. कारण यहोवाच्या साक्षीदारांसाठी प्रवेश निषिद्ध, असे आपल्या घराच्या दरवाजावर लिहावे हे देखील त्या नियमांत म्हटले आहे. आणि खरे तर, यहोवाचे साक्षीदार केवळ देवाच्या वचनाचा प्रचार करतात आणि बायबलचे अधिक सखोल ज्ञान प्राप्त करून देण्यात इतरांची मदत करतात. इटलीमध्ये पटकीची साथ आली तेव्हा तिचा संसर्ग कसा टाळावा, याबद्दल आम्हाला जो सल्ला देण्यात आला होता त्या गोष्टीची अशा प्रकारच्या नियमांमुळे मला आठवण झाली.
“माझ्या मते, चर्च त्याच्या सदस्यांच्या इच्छेकडे लक्ष न देता स्वतःचेच नियम त्यांच्यावर लादत असल्याचे स्पष्ट होते. परंतु काही वर्षांपासून माझ्या पाहण्यात आले आहे, की कॅथलिक लोक सुद्धा घरोघरी जाऊ लागले आहेत; यहोवाच्या साक्षीदारांच्या घरी देखील ते जातात आणि यहोवाचे साक्षीदार त्यांना आत बोलवतात, त्यांच्याशी बोलतात, ते कोणालाही नकार देत नाहीत.”
आपला संदेश स्वीकारावा म्हणून यहोवाचे साक्षीदार इतरांवर जबरदस्ती करत नाहीत. उलटपक्षी, देवाच्या वचनात देण्यात आलेल्या आशेविषयी इतरांना सांगण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यांना स्वतःला सुद्धा या कठीण काळात या आशेद्वारे सांत्वन मिळाले आहे. घरोघरी जाण्याद्वारे तसेच रस्त्यांवर भेटणाऱ्या लोकांशी बोलण्याद्वारे, यहोवाचे साक्षीदार ऐकण्याची इच्छा असणाऱ्यांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगतात.—मत्तय २४:१४; प्रेषितांची कृत्ये ५:४२; १७:१७.