वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ५/१५ पृ. २१
  • प्रामाणिकपणा योगायोगाने की निवडीने?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रामाणिकपणा योगायोगाने की निवडीने?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • दंतवैद्याकडे कागेलेपाहिजे?
    सावध राहा!—२००७
  • यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्यासाठी दृढनिश्‍चयी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ५/१५ पृ. २१

प्रामाणिकपणा योगायोगाने की निवडीने?

“खरं तर मी प्रामाणिक नाहीच; पण कधीकधी योगायोगानं मी तसं वागतो.” विल्यम शेक्सपिअरच्या द विंटर्स टेल मधील अप्रामाणिक ऑटोलिकस असे म्हणतो. यावरून मानवाची एक मूलभूत कमतरता दिसून येते ती म्हणजे वाईट काम करण्याकडे असणारा आपला कल जो ‘कपटी हृदयाचा’ एक परिणाम आहे. (यिर्मया १७:९; स्तोत्र ५१:५; रोमकर ५:१२) तर मग, याबाबतीत आपल्याकडे कोणतीही निवड नाही, असा याचा अर्थ होतो का? सदाचरण हे निव्वळ योगायोगाने होते का? निश्‍चितच नाही!

वाग्दत्त देशात प्रवेश करण्यापूर्वी इस्राएलाच्या पुत्रांनी जेव्हा मवाबाच्या मैदानात तळ ठोकला होता तेव्हा मोशे त्यांच्याशी बोलला. त्याने त्यांच्यासमोर दोन निवडी ठेवल्या. देवाच्या आज्ञा पाळल्यास त्यांना आशीर्वाद मिळणार होते आणि त्या आज्ञांचे उल्लंघन केल्यास पापाची वाईट फळे त्यांना भोगावी लागणार होती. (अनुवाद ३०:१५-२०) निवड त्यांना करायची होती.

आपल्याकडे स्वतंत्र इच्छा असल्यामुळे आपल्यासमोर देखील निवड आहे. सत्कर्मे किंवा दुष्कर्मे करण्यासाठी आपल्यावर कोणीही—इतकेच काय तर देव देखील जबरदस्ती करत नाही. तथापि, एखादा मार्मिकपणे असे विचारेल, ‘आपल्या हृदयाचाच कल वाईट गोष्टींकडे असल्यास आपल्याला चांगल्या गोष्टी करता तरी कशा येतील?’ दंतवैद्य दात किती खराब किंवा सडला आहे हे पाहण्यासाठी तसेच तो आणखीन खराब होऊ नये म्हणून दाताचे परीक्षण करतो. त्याचप्रमाणे कमतरता आणि नैतिक ऱ्‍हास पाहण्यासाठी आपल्याला लाक्षणिक हृदयाचे परीक्षण करण्याची गरज आहे. ते का बरे? कारण “अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्में, चोऱ्‍या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात,” असे येशूने म्हटले.—मत्तय १५:१८-२०.

दात सुरक्षित राहावा म्हणून दंतवैद्याला दाताचा किडलेला सर्व भाग पूर्णपणे काढावा लागतो. त्याचप्रमाणे हृदयातील “दुष्ट कल्पना” आणि अयोग्य इच्छांचे उच्चाटन करण्यासाठी निर्णायक पाऊल उचलण्याची गरज आहे. देवाच्या वचनाचे अर्थात बायबलचे वाचन करण्याद्वारे आणि त्यावर मनन करण्याद्वारे आपण आपल्या निर्माणकर्त्याचे मार्ग जाणतो इतकेच नव्हे तर चांगले ते करण्याचे देखील आपण शिकतो.—यशया ४८:१७.

इस्राएलाच्या दावीद राजाने योग्य ते करण्याच्या संघर्षात जास्तीची ती मदत घेतली. त्याने प्रार्थना केली: “हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्‍न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.” (स्तोत्र ५१:१०) होय, यहोवावर पूर्णपणे विसंबून राहून आपण देखील वाईट कामे करण्याची आपली मनोवृत्ती नियंत्रणात ठेवू शकतो आणि योग्य ते करण्यासाठी ‘नवीन आत्मा’ विकसित करू शकतो. अशा प्रकारे प्रामाणिकपणा ही बाब आपण योगायोगावर सोडणार नाही. ती आपल्यासाठी निवडीची बाब असेल.

[२१ पानांवरील चित्र]

यहोवाला प्रार्थना केल्यामुळे दावीदाप्रमाणे आपल्यालाही चांगले ते करण्यासाठी मदत होऊ शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा