वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ५/१५ पृ. ३२
  • ‘मी देवाला माझे आश्रयस्थान करीन’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘मी देवाला माझे आश्रयस्थान करीन’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ५/१५ पृ. ३२

‘मी देवाला माझे आश्रयस्थान करीन’

या ‘कठीण दिवसांत’ मोह आणि परीक्षांमध्ये अभूतपूर्वरीत्या वाढ होत आहे. उदाहरणार्थ, आपल्या प्रामाणिकपणाची आपल्या कामाच्या ठिकाणी परीक्षा होऊ शकते. शाळासोबत्यांमध्ये आपल्या शुद्धतेची परीक्षा होऊ शकते. आणि नैतिकरीत्या भ्रष्ट जगात आपल्या सचोटीची बहुतेक वेळा परीक्षा होते.—२ तीमथ्य ३:१-५.

बायबलचा लेखक आसाफही अशा प्रकारच्या काळात जगत होता ज्यावेळी दुष्टतेची भरभराट होत होती. त्याच्या काळातील काही लोक तर आपल्या अधम कार्यांची बढाई देखील मारत होते. “अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे,” असे आसाफाने लिहिले. “जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे. ते थट्टा करितात, व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात; ते मोठ्या डौलाने भाषण करितात.” (स्तोत्र ७३:६, ८) अशाच प्रकारची मनोवृत्ती सर्वत्र दिसत नाही का?

चांगली कामे करावी असे वाटणाऱ्‍यांना अशा प्रकारचे वर्तन अगदी दुःखी आणि निराश करणारे देखील आहे. “मी दिवसभर पीडा भोगिली आहे,” आसाफाने शोक व्यक्‍त केला. “ती मला फार दुःखदायक वाटली.” (स्तोत्र ७३:१४, १६) तुम्हालाही कदाचित अशाच प्रकारे वाटेल; परंतु निराश होऊ नका! आसाफ त्याच्या दिवसांतील दुष्टतेचा सामना करू शकला आणि त्याप्रमाणे तुम्ही देखील करू शकता. परंतु ते कसे काय?

अपरिपूर्ण मानवी शासनामध्ये खरा न्याय मिळणे जवळजवळ अशक्य कोटीतील गोष्ट असल्याचे आसाफाला समजले होते. (स्तोत्र १४६:३, ४; नीतिसूत्रे १७:२३) त्यामुळे त्याच्या सभोवताली असणारी दुष्टता काढण्याच्या प्रयत्नात आपला मौल्यवान वेळ, शक्‍ती आणि संपत्ती वाया घालवण्याऐवजी त्याने देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित केले. आसाफाने असे घोषित केले: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्‍यातच माझे कल्याण आहे; मी प्रभु परमेश्‍वराला आपले आश्रयस्थान केले आहे.”—स्तोत्र ७३:२८.

आज, भ्रष्ट व्यापारी अनेकदा भौतिक संपन्‍नतेचा आस्वाद घेतात. काही जण तर देवाच्या नैतिक नियमांचा अवमान केल्याबद्दल तोरा देखील मिरवतात. परंतु त्यांचे अस्तित्व कायमस्वरूपी राहणार नाही. “खचीत तू त्यांना निसरड्या जागांवर उभे करितोस,” असे आसाफाने निरीक्षण केले. तू “त्यांना पाडून त्यांचा नाश करितोस.”—स्तोत्र ७३:१८.

होय, लुच्चेगिरी, हिंसाचार आणि भ्रष्टता तसेच खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी टाळण्यास हवी अशी सर्व अभक्‍त कामे देवाच्या नियुक्‍त समयी काढून टाकण्यात येतील. बायबल अभिवचन देते: “दुष्कर्म करणाऱ्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्‍वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तोत्र ३७:९) तोपर्यंत आपण स्तोत्रकर्त्याच्या शब्दांचा गजर करावा ज्याने म्हटले: “परमेश्‍वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करितो.”—स्तोत्र १८:२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा